मराठी बातम्या /बातम्या /देश /

Mahatma Gandhi Birth Anniversary: महात्मा गांधी यांचे 10 प्रेरणादायी विचार

Mahatma Gandhi Birth Anniversary: महात्मा गांधी यांचे 10 प्रेरणादायी विचार

Mahatma Gandhi

Mahatma Gandhi

अहिंसेच्याच बळावर भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे गांधीजी आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता आजच्या काळात अजूनही टिकून आहे. जाणून घ्या, महात्मा गांधी यांचे( inspiring quotes of Bapu on his birthday) प्रेरणादायी विचार....

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर : महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर रोजी देशभरात साजरी(Mahatma Gandhi Birth Anniversary) केली जाते. गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला होता. मोहनदास करमचंद गांधी सत्य आणि अहिंसेचे पुजारी होते. त्यांनी जगाला अहिंसेचा मंत्र दिला. या अहिंसेच्याच बळावर भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे गांधीजी आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता आजच्या काळात अजूनही टिकून आहे. जाणून घ्या, महात्मा गांधी यांचे( inspiring quotes of Bapu on his birthday) प्रेरणादायी विचार....

1. गांधीजी म्हणतात अहिंसा हा माझ्या श्रद्धेचा पहिला लेख आहे. तसेच तो माझ्या संप्रदायाचा शेवटचा लेख आहे.

2. असं जगा की उद्या तुम्ही मरणार आहात आणि असं शिका की तुम्हाला कायम जिवंत राहायचं आहे.

3. ‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’ या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.

4. आपली घाणेरडी पावले घेऊन माझ्या मनावरून चालण्यास मी कोणालाही परवानगी देणार नाही.

5. पापाचा तिरस्कार करा पापी वर प्रेम करा.

हे वाचा -  इस्रायल-पॅलेस्टाइन वाद : जेव्हा महात्मा गांधीजी म्हणाले होते की, जर मी ज्यू असतो तर...

 6. देवाला कोणताही धर्म नाही.

7. त्या स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही, ज्यात चूक करण्याचे स्वातंत्र्य नाही.

हे वाचा - महात्मा गांधींजीचा आहार कसा होता? त्यांना कोणते खास पदार्थ आवडायचे

8. चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा.

9. हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते.

10. मौनाने क्रोधावर विजय मिळवता येतो.

First published:

Tags: Mahatma gandhi