महात्मा @ 150 : बापूंनी सांगितलेले 15 अनमोल आणि प्रेरणादायी विचार

महात्मा @ 150 : बापूंनी सांगितलेले 15 अनमोल आणि प्रेरणादायी विचार

महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्तानं खास जाणून घ्या महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी अनमोल विचार

  • Share this:

मुंबई, 02 ऑक्टोबर: महात्मा गांधी यांची आज 150 वी जयंती देशभऱात साजरी केली जात आहे. त्यानिमित्तानं वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केलं. आद स्वच्छ भारत अभियानाच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे. नाशिकमध्ये महात्मा गांधींच्या धातू शिल्पाचं आज लोकार्पण करण्यात येणार आहे. महात्मा गांधींनी शिक्षणासाठी ३० सूत्रे मांडली आहेत. त्यांच्या शिक्षणाच्या सुत्रावर आधारीत ३० लोखंडी खांब उभे करून त्यात ३० फुटी शिल्प तयार करण्यात आलं आहे.

महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हटलं जातं. त्यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होतं. त्यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गानं सत्याग्रह करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. 1920 रोजी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत काम करण्यास सुरुवात केली होती. इंग्रजांविरोधात चंपारण सत्याग्रह, असहयोग आंदोलन, भारत छोडो आंदोलन केलं. त्यांच्या या आंदोलनाला त्यावेळी संपूर्ण भारतीयांचा पाठिंबा होता. त्यांचे विचार आणि आचरण सरळ आणि आदर्श होतं. ते स्वत: नियमांचं काटेकोरपणे पालन करणारे होते. त्यांचे विचार प्रेरणादायी, सत्य आणि अनमोल असे होते.

बापूंचे अनमोल आणि प्रेरणादायी विचार

1. तुम्हाला स्वत:ला शोधायचं असेल तर दुसऱ्याच्या सेवेत स्वत: ला झोकून द्या

2. सौम्य प्रकारे, आणि शांततापूर्ण पद्धतीनं आपलं काम करून तुम्ही जगाला हलवू शकता

3. परवानगीशिवाय मला कोणीही दुखवू शकत नाही.

4. हिंसेच्या मार्गानं प्राप्त होणारी गोष्ट ही तात्पुरतं सुख देणारी असते. त्यामुळे होणार नुकसान मात्र दीर्घकालीन असतं.

5. प्रेमानं आणि सत्य मार्गानं जे कष्ट करून मिळतं ते कायमच टिकून राहातं.

6.मनाला चांगल्या विचारांची सवय लागली की तुमचं आचरणही आपोआप चांगलं होतं.

7. जग बदलायचे असेल तर आधी स्वत: पासून सुरुवात करा.

8. आम्ही आमचा स्वाभिमान कुणाला दिला नाही तर कुणी तो हिरावून घेऊ शकत नाही.

9. धीर आणि संयम म्हणजे स्वत: ची परीक्षा पाहणे.

10. तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे ती कृती करण्याआधी कळणार नाही. पण तुम्ही कृती केलीच नाहीत तर त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही.

11. राष्ट्रातील प्रत्येक घर ही शाळा आहे. घरातील आई-वडील हे शिक्षक आहेत.

12. तलवार ही शूरांची नाही तर भीतीची निशाणी आहे. भीती तुमच्या शरीराचा रोग आहे, तो तुमच्या आत्म्याला मारतो.

13. राष्ट्राची महानता त्या राष्ट्रातील प्राण्यांना ज्या पद्धतीनं वागवलं जातं हाताळलं जातं त्यावरुन ठरवली जाऊ शकते.

14. कितीही कोणी चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम पाळणं हे शौर्याचं लक्षण आहे.

15. बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही. बलवान माणूस क्षमा करू शकतो.

First published: October 2, 2019, 11:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading