Home /News /national /

Mahashivratri ला मोठी दुर्घटना; झारखंडमधील देवघर बाबाधाम मंदिरात चेंगराचेंगरी, अनेक भाविक जखमी

Mahashivratri ला मोठी दुर्घटना; झारखंडमधील देवघर बाबाधाम मंदिरात चेंगराचेंगरी, अनेक भाविक जखमी

Mahashivratri 2022: महाशिवरात्रीच्या निमित्ताने देशभरातील मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे.

    देवघर, 1 मार्च : महाशिवरात्री (Mahashivratri) निमित्त देशात विविध मंदिरांत रोषणाई करण्यात आली आहे. भाविक मोठ्या उत्साहात मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत आहेत. मात्र, त्याच दरम्यान झारखंडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. झारखंडमधील बाबाधाम (Babadham) मंदिरात प्रचंड गर्दी झाली आणि त्याच दरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. चेंगराचेंगरीमुळे अनेक भाविक जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनाने केलेली व्यवस्था क्षणार्धात कोलमडली. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे दर्शनम काऊंटरजवळ चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक पुरुष आणि महिला जखमी झाले असल्याचं न्यूज 18 हिंदीने या संदर्भात वृत्त समोर येत आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाने भाविकांवर लाठीमार केला असल्याचं सांगण्यात येत आहे. हा गोंधळ बराच वेळ सुरू होता. यावेळी पूजा आणि दर्शनासाठी आलेले बरकागावचे आमदार अंबा प्रसाद यांनाही जिल्हा प्रशासनाने सहकार्य केले नाही. वाचा : युक्रेनमधून 182 विद्यार्थी मुंबईत दाखल, भारतात पाऊल ठेवताच अश्रू अनावर या दरम्यान मंदिराच्या व्यवस्थापकाने आमदार अंबा प्रसाद यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी आमदार अंबा प्रसाद जखमींना भेटण्यासाठी पोहोचल्या आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची तक्रार करण्यासाठी एसडीओंकडे पोहचल्या तेव्हा त्यांना आतमध्ये प्रवेश दिला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यानंतर आमदार अंबा प्रसाद यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत भाविकांची योग्य ती व्यवस्था केली नसल्याचं म्हटलं आहे. तसेच आमदार या नात्याने नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी मी देवघर येथे दाखल होताच एसडीओ दिनेश कुमार यादव आणि मंदिर व्यवस्थापक रमेश परिहर यांनी वाद घातल्याचाही आरोप आमदार अंबा प्रसाद यांनी केला आहे. या घटनेनंतर आमदार अंबा प्रसाद यांनी म्हटलं, या प्रकरणाची मी वरिष्ठ पातळीवर तक्रार करणार आहे. मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आलेली नाहीये. प्रशासन केवळ व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपींसाठी कार्यरत आहे. सर्वसामान्य भाविकांच्या समस्या कुणीही ऐकून घेत नाहीये.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: India, Jharkhand, Temple

    पुढील बातम्या