शिवसेना प्रवेशाची जोरदार चर्चा, मात्र सुनील तटकरे म्हणतात...

जित पवार यांचे कट्टर समर्थक सुनील तटकरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2019 06:53 PM IST

शिवसेना प्रवेशाची जोरदार चर्चा, मात्र सुनील तटकरे म्हणतात...

मुंबई, 21 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक सुनील तटकरे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र स्वत: सुनील तटकरेंना या सर्व चर्चा फेटाळून लावत आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

'माझ्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्य खोट्या आहेत. मी राष्ट्रवादी सोडणार नाही. यापुढेही मी कायम शरद पवार यांच्यासोबत राहणार आहे,' असं म्हणत सुनिल तटकरे यांनी शिवसेना प्रवेशाच्या चर्चा निरर्थक असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, सुनिल तटकरे यांनी जरी शिवसेना प्रवेशाच्या चर्चा नाकारल्या असल्या तरी तटकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती आहे. सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे तटकरेंचा शिवसेनेत प्रवेश झाल्यास अजित पवारांसाठी मोठा धक्का असू शकतो.

दुसरीकडे, सुनील तटकरे यांनी प्रवेश केल्यास कोकणात शिवसेनेला मोठा फायदा होणार, हे उघड आहे. कारण रायगड जिल्ह्यात तटकरेंचा चांगला प्रभाव आहे. यातूनच तटकरेंच्या प्रवेशाने शिवसेना कोकणात अधिक मजबूत होईल. हाच हेतू समोर ठेवून शिवसेनेच्या नेतृत्वाने सुनील तटकरे यांच्याशी संपर्क केल्याची माहिती आहे.

उदयनराजेही सोडणार साथ?

Loading...

विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. खासदार उदयनराजे लवकरच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उदयनराजे यांनी मंगळवारी रात्री प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी होणारी ही गळती रोखण्यासाठी नक्की काय प्रयत्न करणार, हे पाहावं लागेल.

राज ठाकरेंच्या मदतीला दादूस आला धावून, पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 02:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...