नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : आज पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काश्मिरच्या लेथपोरा येथील सीआरपीएफ कॅम्पसमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्राचे उमेश गोपीनाथ जाधव यांना विशेष पाहुणे म्हणून बोलावण्यात आले आहे. जाधव यांनी या हल्ल्यात प्राण गमावलेल्या 40 जवानांच्या कुटुंबांची भेट घेण्यासाठी भारतभर 61000 किमी लांबीचा प्रवास केला आहे. पुलवामा हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र आजही तो काळा दिवस आठवला तरी अंगावर काटा उभा राहतो. देशातील प्रत्येक व्यक्ती या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आपल्यापरिने श्रद्धांजली अर्पण करीत आहे. यानिमित्ताने काश्मीरच्या लेथपोरा येथील सीआरपीएफ शिबीरात हुतात्म्यांसाठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. या बैठकीला उमेश गोपीनाथ जाधव विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. बंगळुरुचे रहिवासी उमेश गोपीनाथ जाधव हे व्यवसायाने संगीतकार आणि औषधनिर्माणशास्त्रज्ञ आहेत. गेल्या एक वर्षापासून ते शहिदांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करीत आहेत. शहीदांच्या घरी जाऊन त्यांनी शहिदांच्या गावांची माती एकत्र केली आहे.
J&K: Umesh Gopinath Jadhav,from Maharashtra, is the special guest at the wreath-laying ceremony at CRPF campus in Kashmir's Lethpora to mark a yr of #PulwamaAttack today. He took a 61000 km long journey across India to meet families of the 40 jawans who lost their lives in attack pic.twitter.com/zSxQzSLJKS
उमेश यांनी लेथपोरास्थित सीआरपीएफ कॅम्पमध्ये जाऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. येथे ते म्हणाले, मला गर्व आहे की मी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. अनेक आई-वडिलांनी आपल्या मुलगा गमावला...पत्नींनी आपला पती गमावला...अनेक मुलांच्या डोक्यावरील वडिलांचा हात गेला...अनेकांनी आपल्याला नेहमी आधार देणारा मित्र गमावला. मी त्यांचा घराच्या अंगणातील व त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेल्या स्मशानभूमीत जाऊन माती गोळा केली.
पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाधव यांनी भारतभर 61 हजार किमीचा प्रवास केला. त्यांचा प्रवास गेल्या आठवड्यात संपला, ज्याला ते 'तीर्थयात्रा' मानतात. जाधव अस्तिकलश दाखवत असताना म्हणतात, मी वर्षभर प्रत्येक जवानाच्या घराबाहेरील माती गोळा केली आहे. हे सर्व काही या कलशात आहे. ही यात्रा त्यांच्यासाठी खूप खास असल्याचे जाधव यांनी सांगितले. ते म्हणाले, 'सैनिकांची कुटुंबं शोधणं इतकं सोपं नव्हतं. काही घरे अंतर्गत भागात होती. याव्यतिरिक्तही अनेक आव्हानं होती. उमेशच्या गाडीवर देशभक्तीपर घोषणा लिहिलेल्या आहेत आणि जाधव याच गाडीत झोपायचे. दररोज रात्री झोपण्यासाठी हॉटेलचा खर्च परवडत नसायचा, असं जाधव सांगतात.