सेनेच्या मनधरणीसाठी रामदास आठवले राऊतांच्या भेटीला, मांडला मुख्यमंत्रिपदाचा नवा फॉर्म्युला!

सेनेच्या मनधरणीसाठी रामदास आठवले राऊतांच्या भेटीला, मांडला मुख्यमंत्रिपदाचा नवा फॉर्म्युला!

दुसरीकडे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. या भेटीत युतीच्या नव्या फॉर्म्युल्याची चर्चा झाली

  • Share this:

 नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : राज्यात सत्ता स्थापनेचा संघर्ष सुरू आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन महाशिवआघाडीचं सरकार स्थापन करण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. या भेटीत युतीच्या नव्या फॉर्म्युल्याची चर्चा झाली.

रामदास आठवले यांनी आज नवी दिल्लीत संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी आठवले यांनी राऊत यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. आठवले यांनी मुख्यमंत्रिपदासाठी 3-2 असा फॉर्म्युला त्यांच्यासमोर ठेवला. 3 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री आणि 2 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असा आठवलेंनी प्रस्ताव मांडला. भाजपही या प्रस्तावावर विचार करायला तयार आहे, मी याबाबत भाजपच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहे, अशी माहिती आठवले यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. परंतु, त्यांच्या या भेटीबद्दल संजय राऊत यांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

विशेष म्हणजे, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी भाजपचेच सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला होता. आता रामदास आठवले यांनी दोन्ही पक्षांची मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांचा हा प्रस्ताव भाजपला मान्य झाला तरी शिवसेना काय निर्णय घेतं हे पाहण्याचं ठरणार आहे.

Loading...

शरद पवार आणि सोनिया गांधी यांची बैठक

दरम्यान, राज्यात अजूनही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोर बैठका सुरू आहे. सरकार स्थापन करण्यासाठी समसमान कार्यक्रमाचा मसुदाही तयार करण्यात आला आहे. मात्र, यावर अजूनही निर्णय झाला नाही. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होणार आहे.

=====================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2019 06:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...