अमित शहा इन अ‍ॅक्शन, उद्धव ठाकरेंना दिलं ओपन चॅलेंज!

अमित शहा इन अ‍ॅक्शन, उद्धव ठाकरेंना दिलं ओपन चॅलेंज!

नवी दिल्लीत अमित शहा यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये युतीच्या नाट्यावर आपली रोखठोक भूमिका मांडली.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये फूट पडली. अखेर या प्रकरणावर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपली भूमिका मांडली. अडीच वर्ष देण्याचा कोणताही प्रस्ताव नव्हता, असं शहांनी स्पष्ट केलं. तसंच त्यांनी शिवसेनेला ओपन चॅलेंजही दिलं आहे.

नवी दिल्लीत अमित शहा यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये युतीच्या नाट्यावर आपली रोखठोक भूमिका मांडली. आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अजूनही सरकार स्थापन करता येऊ शकते. परंतु, दुसरीकडे शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू केली आहे. जर त्यांच्याकडे संख्याबळ असेल तर त्यांनी खुशाल सरकार स्थापन करावे, असं थेट आव्हानच अमित शहा यांनी सेनेला दिलं.

शिवसेनेनं अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती. पण, ती पूर्ण करणे शक्य नाही. जेव्हा देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली तेव्हा सेनेनं आक्षेप का घेतला नाही, असा थेट सवाल अमित शहा यांनी उपस्थितीत केला.

राज्यपाल यांनी 18 दिवसांचा वेळ दिला होता. आतापर्यंत कोणत्याही राज्यात राज्यपालांनी इतका वेळ दिला नाही. असं सांगत त्यांनी राज्यपालांची भूमिका योग्यचं असल्याचंही ठणकावून सांगितलं.

काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक रद्द

दरम्यान, दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची समन्वय समितीची बैठक होणार होती. या बैठकीला सर्व नेते हजरही होते. मात्र, अचानक ही बैठक रद्द करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार थेट बारामतीला रवाना झाले आहे.

त्याआधी आज दुपारी सेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक झाली. राष्ट्रवादीसोबत चर्चा केल्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा करणार असल्याचं काँग्रेसचे नेचे पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केलं. दरम्यान, सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावरही चर्चा होईल, असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.

=======================

Published by: sachin Salve
First published: November 13, 2019, 7:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या