मराठी बातम्या /बातम्या /देश /indore bus accident : नर्मदा नदीतून बस बाहेर काढली, सांगडा पाहून लोकांचा उडाला थरकाप, LIVE VIDEO

indore bus accident : नर्मदा नदीतून बस बाहेर काढली, सांगडा पाहून लोकांचा उडाला थरकाप, LIVE VIDEO

मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली.

मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली.

मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली.

    इंदूर, 18 जुलै : मध्य प्रदेशमधील इंदूरहून अमळनेरच्या दिशेनं जाणारी एसटी महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. एसटी बस पुल तोडून नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 25 जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. नर्मदा नदीतून अपघातग्रस्त बस बाहेर काढली आहे. बसचा फक्त सांगाडा उरला आहे. बसची अवस्था पाहून अपघातीची तीव्रता किती असेल याचा अंदाज येत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट इथं ही घटना घडली आहे. आज सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. इंदूरवरून अमळनेर येथे येणारी अमळनेर डेपोची बस ही मध्यप्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक नर्मदा नदीत कोसळली.  या बसमध्ये ४० प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

    अमळनेर डेपोची अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा आहे. अमळनेर डेपोचीMH 40 N 9848 क्रमांकाची बस ही इंदूर येथे गेली होती. तेथून परतीच्या प्रवासात खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या कलघाट गावाजवळ नर्मदा नदीच्या पात्रात ही बस सकाळी कोसळली. यात सुमारे ४० प्रवासी असून यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली. या बसमध्ये 50 ते 60 प्रवाशी असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत 13 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर 12 ते 15 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे.या बसमध्ये 13 लहान मुलं या बसमधून प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातून 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. पूर्णक्षमतेनंही बस भरलेली होती. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक प्रवाशी वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    दरम्यान, एस. टी. खात्याचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे. या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते ? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर या भीषण अपघातानंतर परिसरातील जनतेसह पोलीस प्रशासनाने धाव घेऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे.

    First published:
    top videos