पंतप्रधान मोदींची रामलीला मैदानावर रॅली, यासोबत आजच्या 10 ठळक घडामोडी

पंतप्रधान मोदींची रामलीला मैदानावर रॅली, यासोबत आजच्या 10 ठळक घडामोडी

क्रीडा, मनोरंजन, राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

  • Share this:

मुंबई, 22 डिसेंबर: राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा.

1. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामलीला मैदानावर भव्य रॅली. रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात. अनुचित प्रकार टाळण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहणार असल्याची पोलिसांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलीला मैदान येथे सभेला संबोधीत करणार आहेत.

2. दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. तर मुंबईतही अनेक ठिकाणी CAA विरोधात आणि CAAच्या समर्थनार्थ मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

3. उत्तर प्रदेशच्या रामपूर आणि कानपूरमध्ये आजही हिंसा.. मृतांचा आकडा 15वर. अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा स्थगित. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांना घराबाहेर पडू नये राज्य सरकारकडून आवाहन.

4. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मोठी घोषणा करण्यात आली. सरसकट कर्जमाफी सरकारनं जाहीर केली आहे. शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतची कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसंच, यासाठी कोणताही अर्ज भरण्याची आवश्यकता नसणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात येतील, असं अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

5. राज्यातले सिंचनाचे सर्व प्रकल्प तडीस नेणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तर समृद्धी महामार्ग राज्य सरकार स्वबळावर पूर्ण करणार.

वाचा-मोदी सरकारने टॅक्स न भरणाऱ्यांवर उगारला हातोडा, इनकम लपवलं तर होणार कारवाई

6. कॅग अहवालाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी कॉ़ंग्रसेमधील मतभेद उघड झालेत. या अहवालाच्या मुद्यावरून नवाब मलिक आणी जयंत पाटीस सभागृहात आमने-सामने आले. कॅगनं जे ताशारे ओढलेत, त्याला घोटाळा म्हणता येणार नाही, असं जयंत पाटील म्हणाले. तर यावर नवाब मलिकांनी त्यांना टोकलं. घोटाळा झाला नाही असं चुकीचं असल्याची नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे .

7. नागरिकत्व कायद्यामुळे देशाची धार्मिक-सामाजिक घडी विस्कळीत होईल अशी भीती शरद पवारांनी व्यक्त केली. देशातील आर्थिक स्थितीवरुन लक्ष हटवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप पवारांनी केला.

तर सर्व निराधारांना आश्रय द्यायला भारत धर्मशाळा आहे का? राज ठाकरेंचा सवाल

8. आज लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदर तर मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे वेळापत्रक पाहून बाहेर पडण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

9. तिरुवनंतपुरमचे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याविरोधात अटकपत्र काढण्यात आलं आहे. त्रिवेंद्रम येथील न्यायालयाने थरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. शशी थरूर यांनी आपल्या एका पुस्तकारमध्ये हिंदू महिलांना कथित स्वरूपात अपमानीत केलं असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हे प्रकरण शशी थरूर यांचे पुस्तक'द ग्रेट इंडियन नॉवेल' मुळे समोर आलं आहे.

10. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान आज तिसरी वनडे. एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज.

वाचा-मोठी बातमी : बँक KYC साठी नाही द्यावी लागणार धर्माची माहिती, मोदी सरकारचा खुलासा

First published: December 22, 2019, 7:14 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading