Home /News /national /

ठाकरे-शिंदेंमध्ये आरोपप्रत्यारोप, पावसाचा धडाका, महाराष्ट्रासाठी पुढचे पाच दिवस महत्त्वाचे TOP बातम्या

ठाकरे-शिंदेंमध्ये आरोपप्रत्यारोप, पावसाचा धडाका, महाराष्ट्रासाठी पुढचे पाच दिवस महत्त्वाचे TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 6 जुलै : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आता ठाकरे आणि शिंदे यांच्यात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. खरा शिवसेना पक्ष कोणाचा? यावरुन आता नवीन वाद निर्माण झाला आहे. या वाद आता कोर्टात पोहचला असून लवकरच यावर निर्णय येण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात मान्सून चांगलाच सक्रीय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून प्रशासनाला योग्य सूचना दिल्या आहेत. देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा. महाराष्ट्रासाठी पुढचे पाच दिवस महत्त्वाचे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने प्रचंड हाहाकार माजवला आहे. विशेषत: कोकणात आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडवून सोडली आहे. कोल्हापूरमध्ये तर पाऊस प्रचंड कोसळतोय. हा पाऊस रात्रभर असाच सुरु राहिला तर सकाळपर्यंत पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची भीती वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे कोकणात पावसाचा प्रचंड हाहाकार सुरु आहे. कोकणात अनेक नद्यांना पूर आल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. ठाकरे-शिंदे आरोप प्रत्यारोप एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडापासून ते आजपर्यंत त्यांच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक सुरूच आहे. काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. इतकं सारं होऊनही शिवसेना खासदारांची उद्धव ठाकरेंकडे 'ही' मागणी ज्या भाजपमुळे शिवसेनेतील 40 आमदारांनी बंडखोरी केली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. ठाकरे सरकार अडीच वर्षात कोसळलं. त्याच भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी खुद्द शिवसेना खासदारानेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. काल माईक खेचला, उद्या काय खेचतील माहिती नाही, उद्धव ठाकरेंचे खोचक चिमटे ज्यांच्यावर विश्वास ठेवू नका असं सांगत होते ते अजून सोबत आहेत, पण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच दगा दिला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी काल माईक खेचला, उद्या काय खेचतील माहिती नाही, असा खोचक चिमटाही काढला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. सत्ताबदलानंतर फडणवीसांनी पहिल्यांदाच घेतलं अमित शाहंचं नाव उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा मुख्यमंत्री होतील, हे निश्चित मानलं जात होतं, पण फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर करून धक्का दिला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. अपात्रतेच्या कारवाईत नाव वगळण्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया शिंदे गटाने व्हीपचं उंल्लधन केल्याच्या कारवाईत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचं नाव वगळलं आहे. यावर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचं कौतुक, म्हणाले.. येत्या 3 ते 4 दिवसात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि पुण्यातील घाटमाथ्याच्या काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील पावसाचा आढावा घेतला. यावेळी पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात त्यांनी माहिती दिली. यावेळी शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचं मुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक केलं. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. उमेश कोल्हे हत्याकांडाचा मास्टरमाइंड लव्ह जिहादचा आरोपी, खा. बोंडे उदयपूरमधील टेलर कन्हैयालालची हत्या होण्याच्या बरोबर एक आठवड्यापूर्वी अमरावतीमधील (Amravati Crime News) उमेश कोल्हे या 54 वर्षांच्या केमिस्टची हत्या करण्यात आली होती. यावर आता खासदार अनिल बोंडे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मुंबईत पावसाचा धडाका सुरूच! मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. पुढील 4-5 दिवसांत मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळेल, असाही अंदाज वर्तविला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Uddhav tahckeray

    पुढील बातम्या