LIVE: राज्यातील पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत, राज्य सरकारकडून 11,500 कोटींचा निधी

Maharashtra Flood: राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे

  • News18 Lokmat
  • | August 03, 2021, 16:26 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    22:5 (IST)

    अमेरिका - गोळीबारामुळे पेंटागन तात्पुरतं बंद
    मेट्रो स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ गोळीबार
    गोळीबारानंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त
    अमेरिकेतील पेंटागनमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव

    22:0 (IST)

    मुंबईच्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील घटना
    कंटेनर चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात
    कंटेनरची बाईक, बेस्टही जोरदार धडक
    बाईकवरील 2 जण जखमी, बेस्टचालकही जखमी
    डंपरचा थरारक अपघात सीसीटीव्हीत कैद
    कंटेनर चालक फरार, पोलिसांकडून शोध सुरू

    21:33 (IST)

    पंढरपूर - अकलूज, माळेवाडी नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायतीला सरकारचा हिरवा कंदील, नागरिकांच्या 43 दिवसांच्या आंदोलनाला यश, मोहिते-पाटलांच्या नेतृत्वाखाली केलं होतं आंदोलन, आंदोलनाला यश मिळाल्यानं अकलूजकर आनंदित

    21:32 (IST)

    सातारा - शिरवळजवळ धनगरवाडी इथं अपघात, ट्रकची काही वाहनांना धडक, अपघातात 3 ठार तर काहीजण जखमी

    19:47 (IST)

    मी शब्द पाळला, या अजित पवारांच्या दाव्यावर राज्यपालांनी फेरलं पाणी, एमपीएससी सदस्य नियुक्ती यादी 2 ऑगस्टला प्राप्त 
    झाल्याचा केला खुलासा, अजित पवारांनी 31 जुलैपूर्वीच यादी राज्यपालांकडे पाठवल्याचं रोहित पवारांनी केलं होतं ट्विट

    19:40 (IST)

    एमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन इथं सोमवारी प्राप्त, MPSC सदस्य नियुक्तीची फाईल राज्यपालांच्या विचाराधीन

    19:14 (IST)

    अनिल देशमुखांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी टळली, सुप्रीम कोर्टाचे या याचिकेवर सुनावणी करणारं खंडपीठ न बसल्यामुळे सुनावणी पुढे ढकलली

    17:53 (IST)

    पुणे - 23 गावांचा विकास आरखडा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या महानगर नियोजन समितीला मुंबई हायकोर्टानं दिली अंतरिम स्थगिती, फक्त नियोजन समितीला स्थगिती, डीपीला नाही; पीएमआरडीएचं स्पष्टीकरण

    17:22 (IST)

    जिगरबाज साक्षी दाभेकरला मदतीचा हात
    'न्यूज18 लोकमत'च्या बातमीनंतर मोठी मदत
    साक्षीच्या शिक्षणाची जबाबदारी - एकनाथ शिंदे
    साक्षीला 'जयपूर फूट' मिळवून देणार - शिंदे
    साक्षीच्या बहिणीचा शैक्षणिक खर्चही शिंदे उचलणार
    साक्षी दाभेकरकडून बाळाला वाचवण्याच्या प्रयत्न
    अंगावर भिंत कोसळल्यानं गमवावा लागला पाय
    साक्षीवर केईएम रुग्णालयात सुरू आहेत उपचार
    साक्षी दाभेकरला सर्जरीनंतर नवा पाय मिळणार

    17:13 (IST)

    सरकारकडून मदत द्यायला उशीर - प्रवीण दरेकर
    दस्तऐवज वाहून गेले, ओले झाले - प्रवीण दरेकर
    'तुम्ही हे सर्व करणार असाल तर काही उपयोग नाही'
    राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख, त्यांना अधिकार - दरेकर
    'एखाद्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली तर चुकलं काय?'
    विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा सवाल

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स