नाशिकमधलं लाच प्रकरण : अभियंता सतीश चिखलीकरची निर्दोष सुटका

नाशिकमधलं लाच प्रकरण : अभियंता सतीश चिखलीकरची निर्दोष सुटका

सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकरची लाचखोरीतून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

  • Share this:

नाशिक, 26 ऑगस्ट :  सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकरची लाचखोरीतून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नाशिक न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. हा खटला राज्यभरात प्रचंड गाजला होता. या खटल्याच्या आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. बचाव पक्षाने जोरदार युक्तिवाद केल्याने चिखलीकर यांची नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने निर्दोष सुटका केली. 2013 मध्ये सतीश चिखलीकर आणि शाखा अभियंता जगदीश वाघला एसीबीनं सापळा रचून लाच स्वीकारताना अटक केली होती. या कारवाईनंतर राज्यभरात चिखलीकरच्या नावे कोट्यवधींची मालमत्ता आढळून आली होती.

(वाचा : पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का, माजी खासदाराचा भाजप प्रवेश निश्चित)

पण 2018मध्ये मूळ तक्रारदारानं दिलेली फिर्यादच जिल्हा न्यायालयातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला होता. दरम्यान, २०१८साली मूळ तक्रारदाराची फिर्याद चक्क जिल्हा न्यायालयातून गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला होता.

(वाचा : शिवसेनेची अडचण होणार? मित्रपक्षांच्या मदतीने भाजप सोडणार 'इतक्याच' जागा)

नेमकं काय आहे प्रकरण?

एका ठेकेदाराचे 3 लाख 69 हजार रुपयांच्या बिलाची रक्कम मंजूर करण्याच्या मोबदल्यात चिखलीकर आणि वाघनं ठेकेदाराकडे 22 हजार रुपयांची लाच मागितली होती. ठेकेदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यानंतर एसीबीनं सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडलं. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे तपासादरम्यान चिखलीकरकडे तब्बल 14.50 कोटींची मालमत्ता आढळून आली.

(वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांची अणुबॉम्ब टाकण्याची इच्छा, 'हे' आहे कारण...)

VIDEO: सोलापूरमधील भीषण स्फोटात फटाक्यांचा कारखाना जळून खाक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 01:37 PM IST

ताज्या बातम्या