मराठी बातम्या /बातम्या /देश /

राष्ट्रावादीचा मोठा नेता जेलमध्ये जाणार? CNG, PNG दरात कपात, कोरोनाचे पुन्हा भयानक रूप TOP बातम्या

राष्ट्रावादीचा मोठा नेता जेलमध्ये जाणार? CNG, PNG दरात कपात, कोरोनाचे पुन्हा भयानक रूप TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

  • Published by:  Rahul Punde
मुंबई, 17 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक खूप बडा नेता जेलमध्ये जाणार आहे, असं मोहित कंबोज त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यात भुकंपाचे (Nashik Earthquake) धक्के. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 6 रुपयांनी आणि पीएनजीच्या दरामध्ये प्रतिकिलो 4 रुपयांनी कपात केली आहे. राज्यातील पावसाची परिस्थिती पाहता हवामान खात्याने काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा. राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खूप मोठी खळबळ उडाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारण भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक खूप बडा नेता जेलमध्ये जाणार आहे, असं मोहित कंबोज त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. नाशिकमध्ये एका तासात तीन वेळा भूकंप नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यात भुकंपाचे (Nashik Earthquake) धक्के जाणवले आहेत. जांबुटके गावात जमिनीतून स्फोटकांसारखा आवाज झाला, यानंतर स्थानिकांमध्ये घबराट पसरली होती. प्रशानकाडून मात्र घाबरून न जाण्याचं आवाहन करण्यात आलं. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 6 रुपयांनी आणि पीएनजीच्या दरामध्ये प्रतिकिलो 4 रुपयांनी कपात केली आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील. सीएनजीच्या किमतीत सातत्याने वाढ होऊन त्याचे दर पेट्रोल-डिझेलच्या दरांजवळ आहे आहेत. त्यामुळे सीएनजी आणि पाइप्ड कुकिंग गॅसच्या वाढलेल्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. पुढच्या 24 तासांत पश्चिम महाराष्ट्राला पाऊस झोडपणार राज्यात सध्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. तर विदर्भात सलग तीन दिवस पावसाने ठाण मांडले होते. आता त्याठिकाणी पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. मात्र, राज्यातील पावसाची परिस्थिती पाहता हवामान खात्याने काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. 'आपलंच सरकार' तरी पंकजा मुंडेंची फाईल धूळ खात पंकजा मुंडे भाजपमधल्या (Pankaja Munde BJP) मोठ्या नेत्या आहेत. पंकजा यांना पक्षाने मध्य प्रदेशचं (Madhya Pradesh) सहप्रभारी केलं आहे, पण इच्छा असूनही त्यांना मध्य प्रदेशच्या आपल्या आवडत्या डीएसपीला मनाप्रमाणे पोस्टिंग देता येत नाहीये. पंकजा मुंडेंनी दिलेलं शिफारसीचं पत्र गृहविभागाच्या फाईलींमध्ये धूळ खात पडलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलची मोठी कारवाई मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटने गुजरातच्या (Gujarat) भरूच (Bharuch) जिल्ह्यात ड्रग्ज (Drugs) बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी भरूचमधील अंकलेश्वर परिसरातून सुमारे 513 किलो एमडी ड्रग्ज (MD Drugs) जप्त केले आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1,026 कोटी रुपये आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रातील 'या' नागरिकांसाठी एसटीचा प्रवास फ्री महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने सर्वसामान्यांना खूश करण्यासाठी चांगल्या निर्णयांचा धडाकाच लावला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. कोरोनाचे पुन्हा भयानक रूप! देशाच्या राजधानीत कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत असतानाच संसर्गामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही धडकी भरवत आहे. संसर्ग झपाट्याने वाढल्यामुळे रुग्णालयात भरती होणाऱ्या संक्रमितांची संख्या देखील सतत वाढत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
First published:

Tags: Corona, NCP

पुढील बातम्या