Home /News /national /

बंडोबांवर शिवसेना आक्रमक, आता अमित शाह मैदानात? बंडखोर आमदार महाराष्ट्रात येणार TOP बातम्या

बंडोबांवर शिवसेना आक्रमक, आता अमित शाह मैदानात? बंडखोर आमदार महाराष्ट्रात येणार TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 26 जून : गेल्या 5 दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय खलबलांना पूर्णविराम लागत नसल्याचं दिसून येत आहे. एक पक्ष सत्ता स्थापनेसाठी तर दुसरा पक्ष सत्ता वाचविण्यासाठी जीवापाड प्रयत्न करीत आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल मध्यरात्री बंडखोर एकनाथ शिंदे यांची बडोद्यात भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे त्यावेळी अमित शाहदेखील बडोद्यात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुजरात एटीएसच्या पथकाने गुजरात दंगल 2002 (Gujarat Riots 2002) प्रकरणी मुंबईतील कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना ताब्यात घेतले आहे. एकनाथ शिंदे यांची केंद्रीय मंत्री अमित शाहंशी फोनवर चर्चा राज्यात ठिकठिकाणी बंडखोर आमदारांच्या कार्यालय आणि घरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटही सावध झाला असून लवकर यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. नरेश म्हस्केंचा ठाणे जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा नरेश म्हस्के हे ठाण्यातील मोठं नाव आहे. म्हस्के हे सेनेचे ठाण्यातील आक्रमक नेते आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचा त्यांनी राजीनामा दिल्याने ठाण्यातील कार्यकर्त्यांची नाराजी यातून स्पष्ट दिसून येत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. आदित्य ठाकरेंचं आतापर्यंतचं सर्वात आक्रमक भाषण गेल्या अडीच वर्षांपासून पर्यावरण मंत्री म्हणून शांत आणि संयमाने वावरणारे आदित्य ठाकरे आज प्रचंड आक्रमक भूमिकेत दिसले. त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा आदित्य ठाकरेंच्या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा शिवसेनेच्या बंडखोर आमदाराच्या घर-कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसैनिकांना इशारा दिला. बंडखोर आमदार कल्याणकर यांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत नाही, असा इशारा देत चिखलीकर यांनी आमदारांच्या सुरक्षेची हमी दिली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार मुंबईत आल्यानंतर गोंधळाची शक्यता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस परवा त्यांच्या 'सागर' या निवासस्थानातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते गुजरातला एका गुप्त बैठकीसाठी जावून आल्याची चर्चा आहे. ही गुप्त बैठक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातच्या वडोदरा येथे झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. त्यानंतर आता मुंबईत भाजपच्या गोटात आणखी घडामोडी घडत आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा फडणवीस-शिंदेंची भेट अन् सर्किट हाऊसमध्ये अमित शाह? गेल्या 5 दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय खलबलांना पूर्णविराम लागत नसल्याचं दिसून येत आहे. एक पक्ष सत्ता स्थापनेसाठी तर दुसरा पक्ष सत्ता वाचविण्यासाठी जीवापाड प्रयत्न करीत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा बंडखोर आमदारांच्या गोटातून एक आमदार महाराष्ट्रात येणार महाविकास आघाडी सरकारकडून बंडखोर आमदारांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तर आमदारांनी कोर्टात जाण्याचं प्रत्युत्तर दिलं आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान गुवाहाटीतून बंडखोर आमदारांच्या गोटातून एक आमदार औरंगाबादमध्ये दाखल होणार आहे. हे आमदार म्हणजे अब्दूल सत्तार! सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा गुजरात दंगलीप्रकरणी तीस्ता सेटलवाड गुजरात ATS च्या ताब्यात गुजरात एटीएसच्या पथकाने गुजरात दंगल 2002 (Gujarat Riots 2002) प्रकरणी मुंबईतील कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना ताब्यात घेतले असून त्यांना सांताक्रूझ पोलीस ठाण्यात आणले आहे. निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी तिस्ता यांची चौकशी करण्यात येणार आहे. तिस्ता सेटलवाड यांना अहमदाबादमध्ये आणले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Uddhav tahckeray

    पुढील बातम्या