Home /News /national /

सत्तानाट्य शेवटाकडे? आता फडणवीस मैदानात, बंडखोर आमदार मुंबईत येणार? TOP बातम्या

सत्तानाट्य शेवटाकडे? आता फडणवीस मैदानात, बंडखोर आमदार मुंबईत येणार? TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 29 जून : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी भाजपकडून बहुमत चाचणीसाठी पत्र देणार असल्याचं समोर आलं आहे. फडणवीसांच्या दिल्लीवारीनंतर राजकिय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सुरक्षा सोडून दोन तास कुठे गेले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्याला (Maharashtra Politics Crisis) लवकरच पूर्णविराम मिळवण्याची शक्यता आहे. कारण, बंडोखर आमदार मुंबईत येणार असल्याची माहिती मिळत आहे. देशविदेशातील घडामोडी अगदी काही मिनिटांत वाचा. ठाकरे सरकारचं काऊंट'डाऊन' सुरू विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सकाळी दिल्ली येथे जे पी नड्डा आणि अमित शहा यांनी भेट घेतली. यानंतर काही वेळापूर्वी ते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर आल्याचं समोर आलं आहे. यावेळी भाजपकडून बहुमत चाचणीसाठी पत्र देणार असल्याचं समोर आलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. अजित पवार सुरक्षा सोडून दोन तास कुठे गेले? राज्याच्या राजकारणात सध्या तरी एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हा सामना रंगला असला तरी महाविकासआघाडीचे नेते आणि मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भूमिकेकडे डोळ्यात तेल टाकून पाहत आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. औरंगाबादचं संभाजीनगर ठरणार शिवसेनेचा एक्झिट प्लान! खरंतर महाविकासआघाडी सरकार आल्यापासूनच भाजपने औरंगाबादचं संभाजीनगर कधी करणार? असा प्रश्न वारंवार उपस्थित करून शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता, पण सत्तेत असलेल्या काँग्रेसने (Congress) या नामांतराला विरोध केला होता. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंनी ठाकरे सुपूत्रावर साधला थेट निशाणा एकनाथ शिंदेंनी एक ट्विट करून आपला संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी पहिल्यांदा उद्धव ठाकरेंचे सुपूत्र आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शिवसेना बॅकफूटवर का वेगळीच स्ट्रॅटजी? सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतर रोज आक्रमक भाषेचा वापर करणाऱ्या संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज भाषाच बदलली. राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे आमदारच नाही तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही आवाहन केलं. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राज्यातील सत्तानाट्य संपणार? राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्याला (Maharashtra Politics Crisis) लवकरच पूर्णविराम मिळवण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुवाहाटी येथे न्यूज 18 शी बोलताना सांगितले की, 'आम्ही शिवसेनेत आहोत आणि कुठेही जाणार नाही. लवकरच मुंबईला परतणार आहे.'' लवकरच आपल्या पुढील वाटचालीबद्दल सर्वांना माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. उद्धव ठाकरेंनी खरंच फडणवीसांना फोन केला का? सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांना फोन केल्याची चर्चा रंगली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde

    पुढील बातम्या