LIVE NOW

LIVE : रियाला 14 दिवस न्यायालयीन कोठडी; कोर्टाने जामीन नाकारला

कोरोनाचे वाढते रुग्ण ते राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्या. दिवसभरातील सर्व महत्त्वाचे अपडेट

Lokmat.news18.com | September 9, 2020, 12:01 AM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated September 9, 2020
auto-refresh

Highlights

12:01 am (IST)

मोठी बातमी! महाराष्ट्रातले डॉक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात; IMA ने दिला इशारा

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र विभागाने महाराष्ट्र सरकारला दिला इशारा

रुग्णालयाचे दर ठरवण्याच्या आमच्या अधिकारावर हे अतिक्रमण आहे.  

IMA महाराष्ट्रने महाराष्ट्र शासनाकडे केलेल्या न्याय्य मागण्यांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा निषेध म्हणून 10 सप्टेंबरपासून आंदोलन करणार

शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करून शासनाकडे दाद मागणार

आतापर्यंत 150 डॉक्टरांचं Covid-19 च्या साथीत जीव गेला आहे. डॉक्टरांना पुरेशा सुविधा, संरक्षण सामुग्री नाही, IMA चा दावा

11:53 pm (IST)

रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज फेटाळला

22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

उद्या पुन्हा एकदा सत्र न्यायालयात रिया वकिलांमार्फत जामीन अर्ज करणार

10:00 pm (IST)

रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण, कुठल्याही क्षणी येणार निर्णय

रियाला अटक झाल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्याविरोधात तिने जामीन अर्ज दाखल केला होता.

रियाला जामीन मिळणार का याचा निर्णय थोड्याच वेळात

9:45 pm (IST)

'अनेकांना वाटलं टाळ्या, घंटा वाजवल्या की कोरोना जाईल'
पण गेला का, अनेकांचा गैरसमज झाला होता -उद्धव ठाकरे
वास्तव मात्र वेगळं, नाव न घेता नरेंद्र मोदींना टोला

'15 ऑगस्ट तारीख होऊन गेली पण लस आलीच नाही'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका

वस्तू सेवाकराची मोठी रक्कम केंद्र कधी देणार? -मुख्यमंत्री
'राज्यातील सर्व नेते एकत्र येत पीएमना सवाल विचारणार'
'देशात मोदींनी अचानक कडक लॉकडाऊन केला'
आपण मात्र तसं केलं नाही -उद्धव ठाकरे
लॉकडाऊन हळूहळू उठवला देखील -उद्धव ठाकरे

 

9:42 pm (IST)

'अनेकांना वाटलं टाळ्या, घंटा वाजवल्या की कोरोना जाईल'
पण गेला का, अनेकांचा गैरसमज झाला होता -उद्धव ठाकरे
वास्तव मात्र वेगळं, नाव न घेता नरेंद्र मोदींना टोला 

9:25 pm (IST)

राज्यात दिवसभरात कोरोनाचे 20,131 नवीन रुग्ण
राज्यात आज कोरोनाच्या 380 रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज 13,234 रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 71.26 टक्के
राज्यात 2 लाख 43 हजार 446 अॅक्टिव्ह रुग्ण

8:54 pm (IST)

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी रियाला एनसीबीकडून अटक
रिया चक्रवर्तीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

 

8:52 pm (IST)

फक्त नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जायला परवानगी. गरज असेल तेव्हा आणि तितक्याच विद्यार्थ्यांनी शाळेत जावं. इतरांनी ऑनलाईन वर्ग सुरू ठेवावेत.

8:49 pm (IST)

21 पासून शाळा सुरू करण्यास परवानगी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं बंधनकारक

कंटन्मेंट झोनमधल्या शाळा बंदच राहतील.

कंटेन्मेंट झोनमधल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊ नये.

विद्यार्थी आणि शिक्षकांनी कायम 6 फुटांचं अंतर राखणं बंधनकारक असेल.

मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच शाळांना परवानगी

प्राथमिक शाळा उघडणार नाहीत.

 

8:46 pm (IST)

21 सप्टेंबरपासून शाळा उघडायला परवानगी, केंद्राने जाहीर केले नियम

 

Load More
मुंबई, 08 सप्टेंबर : कोरोनाचे वाढते रुग्ण ते राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्या. दिवसभरातील सर्व महत्त्वाचे अपडेट