LIVE NOW

LIVE: BREAKING : दिल्लीतील काही भागात भूकंपाचे धक्के; घाबरुन घराबाहेर पडले लोक

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | December 18, 2020, 12:33 AM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated December 18, 2020
auto-refresh

Highlights

9:21 pm (IST)

नागपूर - हिंगणा MIDCमध्ये कारखान्याला आग
अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी
या कारखान्यात होतं प्लास्टिकचं प्रोसेसिंग
अग्निशमनचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

9:16 pm (IST)

दिग्दर्शक करण जोहरच्या अडचणीत वाढ
पार्टीच्या व्हिडिओची NCBनं मागवली माहिती

8:33 pm (IST)
सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतापगडावर कलम 144 लागू, यावर्षी कोरोनामुळे शिवप्रताप दिन साध्या पद्धतीनं साजरा होणार, प्रतापगडावर मनोरंजन, देखावे, प्रदर्शन कार्यक्रम करण्यास शासनाची सक्त मनाई, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शिवप्रताप दिन होणार साजरा
 
8:09 pm (IST)

नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा मुद्दा
धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना दिलासा
31 इमारतींना पुनर्विकासाची दिली परवानगी
586 कुटुंबांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
ओळख समितीच्या बैठकीत घेतला निर्णय
3 एफएसआयनं इमारतींचा होणार पुनर्विकास
मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांची माहिती

8:06 pm (IST)

पुणे - मद्यधुंद चालकानं दोघांना उडवलं, अपघातात 2 जण गंभीर जखमी, सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुकची घटना

7:52 pm (IST)

मेल, एक्स्प्रेसनं येणाऱ्या किंवा जाणाऱ्या प्रवाशांना आता लोकलनं प्रवास करता येणार; मेल, एक्स्प्रेसचं वैध तिकीट असलेल्या प्रवाशांना एकेरी प्रवासाचं तिकीट मिळेल

7:44 pm (IST)

राज्यात दिवसभरात 3,880 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 4,358 रुग्ण बरे
राज्यात दिवसभरात 65 रुग्णांचा मृत्यू
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94.14 टक्क्यांवर
राज्यात सध्या 60,905 अॅक्टिव्ह रुग्ण

7:37 pm (IST)

शस्त्रं, सैन्य उपकरणांच्या खरेदीला परवानगी
संरक्षण मंत्रालयाचा तिन्ही सैन्यदलांसाठी निर्णय
28,000 कोटींची शस्त्रं आणि सैन्य उपकरणं
स्थानिक क्षेत्रातूनच ही खरेदी केली जाणार

7:22 pm (IST)

निवडणुका असू दे, निर्णय असू देत, शिवसेना स्वत:चं प्रचंड नुकसान करून घेतंय -चंद्रकांत पाटील

7:22 pm (IST)

कोण संजय राऊत म्हणत चंद्रकांत पाटलांनी उडवली खिल्ली, अजित पवारांनाही लगावला टोला

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स