LIVE NOW

LIVE : उद्या व्यापाऱ्यांचा एक दिवसासाठी बंद

राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आणि कोरोनाचे अपडेट्स वाचा.

Lokmat.news18.com | August 24, 2020, 9:58 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated August 24, 2020
auto-refresh

Highlights

9:58 pm (IST)

रायगड - महाडच्या काजळपुरा इथं 5 मजली इमारत कोसळली
महाड इमारत दुर्घटनेत एकाचा मृत्यू, एकजण गंभीर
एनडीआरएफकडून मदत आणि बचावकार्य
मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादांकडून मदतकार्याचा आढावा
जलदगतीनं मदतकार्य व बचावकार्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी मदत

9:03 pm (IST)

रायगडमधील इमारत दुर्घटना धक्कादायक -अमित शाह
सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो -अमित शाह

 

9:02 pm (IST)

रायगड दुर्घटनेबाबत अमित शाहांनी केली NDRF च्या संचालकांशी चर्चा

केंद्रिय गृहमंत्री अमित शाहा यांनी महाड इमारत दुर्घटनेविषयी Tweet करून ही अत्यंत धक्कादायक दुर्घटना असल्याचं म्हटलं आहे. NDRF च्या संचालकांशी आपली चर्चा झाली असून इमारतीत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी लागेल ते सर्व सहकार्य केलं जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.


8:57 pm (IST)

बचावकार्य युद्धपातळीवर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

अजित पवारांनी पालकमंत्री आदिती तटकरेंशी साधला संपर्क
महाड इमारत दुर्घटनेची अजित पवारांनी घेतली माहिती
जिल्हाधिकारी निधी चौधरींशीही दूरध्वनीवरून संपर्क
बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर करण्याचे निर्देश
अजित पवार सुनील तटकरे, भरत गोगावलेंच्या संपर्कात

8:41 pm (IST)
'बाजार समिती अंतर्गत आकारणी करत असलेला सेस बंद करा'
उद्या व्यापाऱ्यांचा राज्यव्यापी एक दिवसाचा लाक्षणिक बंद
पुण्यातील भुसार आणि गूळ बाजार उद्या राहणार बंद
7:02 pm (IST)

रायगड - महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली
महाडच्या काजळपुरा परिसरातील दुर्घटना
महाडमध्ये तारिक गार्डन नावाची इमारत कोसळली
60 कुटुंब इमारतीत असल्याची प्राथमिक माहिती
एनडीआरएफची टीम महाडच्या घटनास्थळी रवाना

'न्यूज18 लोकमत' सर्वात आधी ग्राऊंड झीरोवर
थेट घटनास्थळाहून 'न्यूज18 लोकमत'चा LIVE रिपोर्ट
महाड दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली चर्चा
आ.भरत गोगावले, जिल्हाधिकारी निधी चौधरींशी चर्चा
'जलदगतीनं बचावकार्य आणि मदतकार्यासाठी सहकार्य'
शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
प्रवीण दरेकर महाडच्या दुर्घटनास्थळी मुंबईहून रवाना
जुन्या, धोकादायक इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करा -दरेकर

 

 

7:01 pm (IST)

नाशिक जिल्ह्यातील धरणाचं पाणी महाराष्ट्राच्याच जमिनीला देणार, पाणी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ देणार नाही, महाराष्ट्रातील अनेक भाग पाण्यापासून वंचित, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची तहान भागवणं आवश्यक -पालकमंत्री छगन भुजबळ

6:59 pm (IST)

धरणाचं पाणी महाराष्ट्राच्याच जमिनीला देणार -छगन भुजबळ
'नाशिक जिल्ह्याचं पाणी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ देणार नाही'
महाराष्ट्रातील अनेक भाग पाण्यापासून वंचित -छगन भुजबळ
'महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची तहान भागवणं आवश्यक'

6:46 pm (IST)

काँग्रेस सदस्य अभियान सुरू करण्याचा बैठकीत निर्णय?
कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत घमासान
राजीव सातव यांनी गुलाम नबी आझाद, आनंद शर्मांना केलं टार्गेट

 

6:27 pm (IST)

ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली कोरोना स्थितीचा आढावा
ठाण्यात कोविड सेंटरचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
ठाण्यात 1800 खाटांचं कोविड हॉस्पिटल -उद्धव ठाकरे
गाफील न राहण्याचं मुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन

Load More
मुंबई, 24 ऑगस्ट : Coronavirus चा प्रादुर्भाव कमी झालेला नसला, तरी Unlock च्या पुढच्या टप्प्यात देशपातळीवर आणखी काही निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.