LIVE NOW

LIVE : आता मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन सर्व स्टेशनवर थांबणार

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.

Lokmat.news18.com | October 9, 2020, 9:08 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated October 9, 2020
auto-refresh

Highlights

9:08 pm (IST)

राज्यात आज 12 हजार 134 नव्या रुग्णांची भर
राज्यात आज 302 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
राज्यात आज 17 हजार 323 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 81.63 टक्के

8:19 pm (IST)

मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन सर्व स्टेशनवर थांबणार, याआधी काही ठराविक स्टेशनवरच थांबत होत्या लोकल
सीएसएमटी ते कसारा या मार्गावर तानशेत आणि उंबरमाळी व्यतिरिक्त सर्व स्टेशनवर थांबणार, सीएसएमटी ते कर्जत या मार्गावर शेलू व्यतिरिक्त सर्व स्टेशनवर थांबणार, सीएसएमटी ते पनवेल या मार्गावर रे रोड, कॉटन ग्रीन, किंग्जसर्कल, चुनाभट्टी, मानसरोवर  व्यतिरिक्त सर्व स्टेशनवर थांबणार, त्याचबरोबर मध्य रेल्वेनं अतिरिक्त 22 लोकल वाढवल्या

8:16 pm (IST)

शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट करणं अभिनेत्री कंगना राणौतला महागात पडलं आहे. तिच्याविरुद्ध FIR दाखल करण्याचे आदेश कर्नाटकमधल्या एका कोर्टाने दिले आहेत. वाद झाल्याने ते ट्विट तिने नंतर डिलिटही केलं होतं.


8:08 pm (IST)

मुख्यमंत्र्यांसोबत 'सह्याद्री'वर झाली बैठक
ओबीसी नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी केली चर्चा
प्रकाश शेंडगेंसह प्रमुख नेते बैठकीला होते उपस्थित
ओबीसी समाजासाठी मंत्रिगट स्थापण्यास मान्यता
ओबीसी समाज आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय
ओबीसींचे विविध प्रश्न या समितीसमोर मांडले जाणार
'ओबीसी समाजासाठी भरीव आर्थिक मदत करा'
ओबीसी नेत्यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

 

7:22 pm (IST)

MPSC परीक्षा पुढे ढकलल्यानंतर कोल्हापुरात विद्यार्थ्यांनी एकमेकांना साखर भरवून केला आनंदोत्सव

7:22 pm (IST)

MPSC परीक्षा लांबणीवर, विनायक मेटेंकडून मुख्यमंत्र्यांचे आभार

7:22 pm (IST)

मराठा समाजाच्या भावना समजून MPSC परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय, मराठा समाजाच्या वतीने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मानले राज्य सरकारचे आभार

6:39 pm (IST)

MPSC परीक्षेसंदर्भात सर्वात मोठी बातमी
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली -मुख्यमंत्री
11 ऑक्टोबरची MPSC परीक्षा रद्द -मुख्यमंत्री
'अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून परीक्षा पुढे'
कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही -मुख्यमंत्री
लवकरच बसून निर्णय नवा निर्णय घेणार -मुख्यमंत्री
परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करणार -मुख्यमंत्री
'पुढे जाहीर केलेल्या तारखेलाच परीक्षा होणार'
मराठा संघटनांची मागणी राज्य सरकारकडून मान्य
सर्व विचार करून निर्णय घेतला -अशोक चव्हाण

 

6:02 pm (IST)

मुंबईत 2 आठवड्यात तयार होणार प्लाझ्मा बँक
मुंबईतील केईएम रुग्णालयात तयार होणार प्लाझ्मा बँक
'मुंबईत प्लाझ्मा थेरपीनं बरं होण्याचं प्रमाण 99 टक्के'
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणींचा दावा

5:58 pm (IST)

पुण्यातील 30 हजार दुकानदारांना मोठा दिलासा
पुण्यातील सर्व दुकानंही आता 9 वाजेपर्यंत खुली राहणार
पुणे शहरातील दुकानांची वेळ सकाळी 9 ते रात्री 9
मनपा आयुक्त विक्रम कुमारांचे सुधारित वेळेचे आदेश
'न्यूज18 लोकमत'नं मांडली होती व्यापाऱ्यांची समस्या

 

 

Load More
मुंबई, 09 ऑक्टोबर : कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.