• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • LIVE : निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप शिंदे यांचा कोरोनामुळे मृत्यू

LIVE : निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप शिंदे यांचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनाचे वाढते रुग्ण ते राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्या. दिवसभरातील सर्व महत्त्वाचे अपडेट

 • News18 Lokmat
 • | September 04, 2020, 00:13 IST
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  0:12 (IST)

  मुंबई - 
  - निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप अक्रम शिंदे यांचा कोरोना मुळे मृत्यू
  - 1987 च्या बॅचचे पोलीस अधिकारी
  - सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार

  21:1 (IST)

  नागपूर जिल्ह्यात आज 1,727 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद
  नागपूर जिल्ह्यात दिवसभरात 45 रुग्णांचा मृत्यू
  नागपुरातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 34 हजार 432

  20:52 (IST)

  पुण्यात दिवसभरात 1764 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
  पुण्यात दिवसभरात 1188 रुग्णांना डिस्चार्ज
  पुण्यात आज 48 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
  पुण्यात कोविड रुग्णसंख्येचा 1 लाखाचा टप्पा पार
  पुण्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 100459
  पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 15973

  20:29 (IST)

  राज्यात आज कोरोनाचे तब्बल 18 हजार 105 रुग्ण
  राज्यात दिवसभरात कोरोनामुळे 391 जणांचा मृत्यू
  राज्यात आज 13 हजार 988 रुग्ण बरे होऊन घरी
  राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 72.58 टक्के
  राज्यात आतापर्यंत 6 लाख 12,484 रुग्ण कोरोनामुक्त
  राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 8 लाख 43 हजार 844

  20:23 (IST)

  राज्यात आज कोरोनाचे तब्बल 18 हजारांवर रुग्ण
  राज्यात दिवसभरात कोरोनामुळे 391 जणांचा मृत्यू

  19:43 (IST)

  परीक्षेसंदर्भात राज्यपालांचा आदेश; 31 ऑक्टोबरपूर्वी निकालही जाहीर करा

  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या सर्व विद्यापीठांचे कुलपती या नात्याने अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि निकालाविषयी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना आदेश दिला आहे. फक्त परीक्षाच नाही, तर निकालाची प्रक्रियासुद्धा पुढच्या महिन्याच्या अखेरीपर्यंत संपवा, असं त्यांनी सांगितलं आहे.

  19:13 (IST)

  कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात आज कोरोनाचे 405 रुग्ण
  कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात रुग्णांचा 30,000 टप्पा पार
  कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत कोरोनामुळे 650 वर मृत्यू

  19:0 (IST)

  नाशिकमध्येही आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार उघड
  बेड उपलब्ध असल्याच्या आयुक्तांच्या दाव्याची पोलखोल
  नाशिक शहरात 19 व्हेंटिलेटर आणि 198 बेड आहेत कुठे?
  'न्यूज18 लोकमत'च्या रिअॅलिटी चेकमध्ये वास्तव समोर

  18:21 (IST)

  'फेसमास्क' न वापरणाऱ्यांवर मुंबई पालिकेची दंडात्मक कारवाई
  , 5 महिन्यांत महापालिकेनं केला 27 लाख 48 हजारांचा दंड वसूल, सार्वजनिक ठिकाणी मास्क आवर्जून परिधान करण्याचं पुन्हा एकदा आवाहन

  18:16 (IST)

  विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी
  उद्या 12 वाजता समितीचा अहवाल जाहीर करणार -सामंत
  'परीक्षांबाबत कुलगुरूंनी 2 दिवसांत मार्गदर्शन करावं'
  15 ते 30 सप्टेंबरपर्यंत प्रॅक्टिकल परीक्षेचा प्रयत्न -सामंत
  '31 ऑक्टोबरपर्यंत परीक्षांचे निकाल लावण्याचा प्रयत्न'
  राज्यपाल आणि कुलगुरूंची भेट घेतली -उदय सामंत
  घरात बसून परीक्षा घेण्याबाबत राज्यपाल अनुकूल -सामंत
  'एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा याच पद्धतीनं होणार'

  मुंबई, 03 सप्टेंबर : कोरोनाचे वाढते रुग्ण ते राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्या. दिवसभरातील सर्व महत्त्वाचे अपडेट