LIVE: पंतप्रधानांनी 53 मिनिटांतच आटोपला पुणे दौरा, एअरपोर्टकडे बायरोड रवाना

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 28, 2020, 18:03 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  19:30 (IST)

  'पंतप्रधानांसोबत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा'
  'मोदींना लसीच्या उत्पादनाबाबत माहिती दिली'
  कोरोनावरील लसीबाबत सखोल चर्चा -पुनावाला
  लसीच्या किमतीवर चर्चा झाली नाही -पुनावाला
  लसीच्या तिसऱ्या चाचणीवर लक्ष -पुनावाला
  'लसीचं वितरण पहिल्यांदा भारतात होणार'
  'सरकारच्या मागणीप्रमाणे लसीचा पुरवठा'
  'जुलै 2021 पर्यंत 30-40 कोटी डोस बनवणार'
  'लसीच्या तयारीबद्दल पंतप्रधान मोदी समाधानी'
  लसीच्या साठवणीची पुरेशी व्यवस्था -पुनावाला
  'लसीची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी असेल'
  'कोविशील्ड' लस पूर्णपणे सुरक्षित -अदर पुनावाला

  18:10 (IST)

  अदर पुनावालांची 7 वा. पत्रकार परिषद
  लसीबाबत पुनावाला अधिक माहिती देणार

  17:46 (IST)

  पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 'मिशन व्हॅक्सिन'
  पुण्यातील 'सिरम'मध्ये कोरोना लसीचा आढावा
  मोदी तासभर होते सिरम इन्स्टिट्यूटमध्ये
  पंतप्रधान मोदींची अदर पुनावालांशी चर्चा
  'सिरम'च्या प्रतिनिधींसोबत मोदींची चर्चा
  मोदींकडून लस निर्मिती प्लँटची पाहणी
  पंतप्रधान 'सिरम'मधून पुणे विमानतळाकडे 

  17:46 (IST)

  पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 'मिशन व्हॅक्सिन'
  पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर
  अहमदाबाद, हैदराबादनंतर मोदी पुण्यात
  पंतप्रधान मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये
  कोरोना लस निर्मिती प्रक्रियेचा आढावा
  'सिरम'च्या प्रतिनिधींसोबत केली चर्चा
  मोदींकडून लस निर्मिती प्लँटची पाहणी 

  16:24 (IST)

  पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर
  पंतप्रधान मोदी पुणे विमानतळावर दाखल
  थोड्याच वेळात मांजरीला होणार रवाना
  पंतप्रधान सिरम इन्स्टिट्यूटला देणार भेट
  'सिरम'मध्ये घेणार कोरोना लसीचा आढावा 

  15:48 (IST)

  मुनगंटीवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

  15:42 (IST)

  'महाराष्ट्रात रडणारं सरकार, लढणारं नाही'
  हे फसवणुकीतून आलेलं सरकार -मुनगंटीवार
  'ठाकरे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?'
  'वर्षभरात मुख्यमंत्री विदर्भात आले नाहीत'
  'राज्य सरकारनं विदर्भाला वाऱ्यावर सोडलं'
  'नागपुरात अधिवेशन घेतलं तर कोरोना होतो'
  'मुंबईत अधिवेशन घेतलं तर कोरोना नाही'
  असा राज्य सरकारचा तर्क -सुधीर मुनगंटीवार 

  15:39 (IST)

  शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे LIVE
  महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती
  'सरकारनं अनेक व्यापक निर्णय घेतले'
  आमचं सर्व कामकाज रोखठोक -गोऱ्हे
  सरकारमध्ये तिन्ही पक्ष एकत्र -गोऱ्हे
  'तिन्ही पक्षांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास'
  वीज मंडळाकडून चूक झाली -गोऱ्हे
  'सामान्य वीज ग्राहकांचा विचार करावा'
  'वीज मंडळानं सहानुभूती दाखवली पाहिजे'
  'महसूल कर्मचाऱ्यांनी जबाबदारीनं काम करावं' 

  15:37 (IST)

  मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला अल्टिमेटम
  '2 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावा'
  'अन्यथा पवारांच्या बारामतीच्या घरावर मोर्चा'
  'आमदारांना चोळी-बांगडीची भेट देणार'
  मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय 

  15:37 (IST)

  धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग
  तरुणीला ट्रेनमधून खाली फेकण्याचा प्रकार
  आटगाव-कसारा रेल्वे स्थानकांदरम्यान घटना
  कल्याण रेल्वे पोलिसांनी 2 जणांना केली अटक 

  मुंबई, 28 नोव्हेंबर : कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स