liveLIVE NOW

LIVE: सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रकृतीत सुधारणा, उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 26, 2020, 18:22 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 7 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  22:11 (IST)

  ब्रिटनहून आलेले 1122 पैकी 16 प्रवासी कोरोनाबाधित
  या प्रवाशांना नव्या कोरोनाची लागण झाली आहे का?
  16 जणांचे नमुने तपास करण्यासाठी पुण्याला पाठवले
  प्रवाशांच्या संपर्कात असलेल्या 72 जणांच्या चाचण्या
  'त्या' 72 जणांपैकी 2 जणांना कोरोनाची लागण
  नागपूर 4, मुंबई, ठाणे, पुणे येथे प्रत्येकी 2 पॉझिटिव्ह
  रायगड, नांदेड, नगर, औरंगाबादेत प्रत्येकी एक रुग्ण

  22:2 (IST)

  अकोला - गोळीबारात व्यावसायिकाची हत्या
  एमआयडीसीतल्या अप्पू पॉईंटजवळील घटना
  गोळीबाराच्या घटनेमुळे अकोला शहरात खळबळ
  व्यावसायिकाच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

  20:46 (IST)

  राज्यात दिवसभरात 2,854 नवे रुग्ण
  राज्यात दिवसभरात 1,526 रुग्ण बरे
  राज्यात दिवसभरात 60 रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94.34 टक्के
  राज्यात सध्या 58,091 अॅक्टिव्ह रुग्ण

  20:44 (IST)

  नागपूर - नव्या स्ट्रेनचा संशयित पॉझिटिव्ह रुग्ण
  नागपुरात आढळला युकेतून आलेला नवा रुग्ण
  काही दिवस अगोदर नागपुरात आल्याची माहिती
  खबरदारी म्हणून स्वतः झाला विशेष वॉर्डात भरती
  युकेतून आलेले संशयित पॉझिटिव्ह रुग्ण 4 वर 

  18:47 (IST)

  नागपूर मनपाच्या हद्दीतील शाळा 4 जानेवारीपासून
  मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आदेश
  नववी ते बारावीचे वर्ग 4 जानेवारीपासून सुरू
  कोविड नियमांचं पालन बंधनकारक राहणार
  शिक्षक, कर्मचाऱ्यांना RTPCR प्रमाणपत्र बंधनकारक
  सर्व पालकांना संमतीपत्र लिहून द्यावं लागणार 

  18:15 (IST)

  दाक्षिणात्य अभिनेता, सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रकृतीत सुधारणा
  हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
  रक्तदाब नियंत्रणात, चिंताजनक नाही
  अहवाल पाहून उद्या सकाळी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

  16:38 (IST)

  'कोल्हापूरला जाणार या वाक्यानं हुरळून जाऊ नये'
  पक्षानं दिलेलं मिशन पूर्ण करणार -चंद्रकांत पाटील
  मी मिशन पूर्ण करून जाईन -चंद्रकांत पाटील
  'कुठेही असलो तरी राज्याचाच विचार करणार'
  3 पक्ष वेगळे लढणार हे नाटक -चंद्रकांत पाटील
  'एकत्र आले तर तिकीट वाटपावरून भांडणं होतील'
  हे न कळायला आम्ही किंवा जनता मूर्ख नाही -पाटील
  'मराठा आरक्षणाचं खापर केंद्रावर फोडणं चुकीचं'
  महाविकास आघाडी सरकार घोळ घालतंय -पाटील
  'खडसेंना ईडीची नोटीस आली का माहीत नाही'
  'भाजपवर, फडणवीसांवर खापर फोडणं अयोग्य'
  'ओबीसीत मराठा समाजाला घालणं हा तोडगा नाही'
  'अजित पवारांना आमच्या पक्षाचं काय पडलंय?'
  अजित पवारांनी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावं -पाटील

  15:18 (IST)

  ईडीच्या नोटीसवर खडसेंची पहिली प्रतिक्रिया
  मला ईडीची नोटीस आली -एकनाथ खडसे
  'नोटीस आल्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून फोन'
  सहानुभूती व्यक्त केली जातेय -एकनाथ खडसे 

  13:58 (IST)

  औरंगाबाद - महाराजाची वारकऱ्यांवर चाल
  साधूनं वारकऱ्यांना तलवारीनं धमकावलं
  पैठणच्या जांभळीतील राम मंदिरातील घटना
  संतप्त गावकऱ्यांना बघून महाराजांचं पलायन

  13:47 (IST)


  एकवीरा देवी गडावर भाविकांची गर्दी 
  भाविकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

  सरकारच्या नियमांकडे भाविकांकडून दुर्लक्ष
  सलग सुट्ट्यांमुळे भाविकांच्या संख्येत वाढ

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स