LIVE NOW

LIVE : मंदिरे उघडण्याच्या मागणीला हिंसक वळण, VHPकडून एसटी जाळण्याचा प्रयत्न

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा सविस्तर.

Lokmat.news18.com | October 24, 2020, 9:34 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated October 24, 2020
auto-refresh

Highlights

9:28 pm (IST)

सोलापूर ब्रेकिंग : 

- विश्व हिंदू परिषदेने केला एसटी जाळण्याचा प्रयत्न 

- मंदिर उघडण्याच्या मागणीला लागले हिंसक वळण 

- सोलापूर-बार्शी रोडवरील पानगावनजिक एसटी आडवून टायर जाळण्याचा प्रयत्न

- कार्यकर्त्यांनी एसटीला बॅनर लावून एसटीचे टायर पेटवले

8:35 pm (IST)

राज्यात आज 6 हजार 417 नवे पॉझिटिव्ह रुग्ण
राज्यात आज 10 हजार 4 रुग्णांना डिस्चार्ज
राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 88.78 टक्के
राज्यात दिवसभरात कोरोनामुळे 137 रुग्णांचा मृत्यू 

7:59 pm (IST)

'कोरोनारूपी रावणाचा नाश करू या'
मुख्यमंत्र्यांकडून जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा
अजित पवारांनीही विजयादशमीच्या दिल्या शुभेच्छा

7:42 pm (IST)

'पोलिसांवर असा हल्ला करण्याची हिंमत का होते?'
'राज्य सरकारनं याची गंभीर दखल घेतली पाहिजे'
याबाबत कारवाई झाली पाहिजे -आशिष शेलार

7:33 pm (IST)

रस्त्यावर अशा परिस्थितीत हल्ले करणाऱ्यांना धडा शिकवा, कोणी तरी ऐरीगैरी नटी पोलिसांना माफिया म्हणते हे आपण थंडपणे बघतो -संजय राऊत

7:00 pm (IST)

पुणेकरांनी कोरोनावर मात करून करून दाखवली
रिकव्हरी रेटमध्ये पुणे देशात नंबर वन
पुण्याचा कोरोना रिकव्हरी रेट 92.81 टक्के
चेन्नई, दिल्लीला मागे टाकत पुणे देशात नंबर वन
कोरोनाच्या बाबतीत पुणे बनलं होतं नंबर वन

6:43 pm (IST)

पुण्यात दिवसभरात 329 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
पुण्यात दिवसभरात 774 रुग्णांना डिस्चार्ज
पुण्यात आज 23 कोरोनाबाधितांचा मृत्यू
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 6 हजार 885

6:13 pm (IST)

औरंगाबाद ब्रेकिंग
27 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टातील सुनावणीमध्ये मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवली नाही तर 28 ऑक्टोबरला बैठक घेऊन राज्य सरकारविरोधात तीव्र आंदोलन करू, असा इशारा क्रांती मोर्चाच्या रमेश केरे पाटील यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या विरोधात ज्यांच्या याचिका आहेत त्यांच्या दारावर आंदोलन सुरू करणार - केरे पाटील
सत्ताधारी मंत्री जिथे जातील तिथे त्यांचे काळे झेंडे दाखवून निषेध केला जाईल - रमेश केरे पाटील

5:51 pm (IST)

शिर्डी - साई मंदिर खुलं करण्याची मागणी
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन
शंखनाद, घंटानाद, ढोल बजाओनं साईंची आरती
राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

5:07 pm (IST)

औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक
मराठा आरक्षण प्रकरणी 27 ऑक्टोबरला सुनावणी
'स्थगिती न उठवल्यास राज्य सरकारविरोधात आंदोलन'
'विद्यार्थ्यांना दिलेल्या सोयीसुविधा पुन्हा बहाल कराव्यात'
'विरोधात ज्यांच्या याचिका, त्यांच्या दारावर आंदोलन करू'
रमेश केरे पाटील यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
'सत्ताधारी मंत्र्यांविरोधात काळे झेंडे दाखवून निषेध करू'

Load More
मुंबई, 24 ऑक्टोबर : कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा सविस्तर.