LIVE NOW

LIVE : राज्यसभेत सभागृहाची वेळ वाढविण्याच्या मुद्यावरून जोरदार गोंधळ

कोरोनाचे देशभरातील अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.

Lokmat.news18.com | September 20, 2020, 8:55 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated September 20, 2020
auto-refresh

Highlights

8:55 pm (IST)

केडीएमसी क्षेत्रात मास्क परिधान न करणाऱ्यांना दणका
आज 414 नागरिकांकडून रु. 2,06,700 इतका दंड वसूल

8:29 pm (IST)

'शिवसेना-राष्ट्रवादीनं कृषी विधेयकाला पाठिंबा का दिला?'
याचा जाहीर खुलासा करावा; प्रकाश आंबेडकरांचं आव्हान

8:24 pm (IST)

गृहमंत्र्यांचा नाव न घेता कंगना आणि भाजपवर निशाणा
नाव घेणार नाही, लायकी नाही -अनिल देशमुख
'मुंबईची तुलना POK शी करते, पोलिसांना माफिया म्हणते'
'राजकीय पक्ष फायद्यासाठी पाठबळ देतो हे खालच्या थराचं आहे'
नागरिकांनीही याची गंभीर दखल घ्यावी -गृहमंत्री अनिल देशमुख

8:14 pm (IST)

नवी मुंबईत कोरोनाचे आज 367 रुग्ण आढळले
नवी मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 33,146
नवी मुंबईत आज 6 जणांचा मृत्यू, 365 रुग्ण कोरोनामुक्त

8:04 pm (IST)

नागपूर जिल्ह्यात आज कोरोनाच्या 1,226 रुग्णांची नोंद
नागपूर जिल्ह्यात दिवसभरात 54 रुग्णांचा मृत्यू

7:51 pm (IST)

राज्यात कोरोना रुग्ण बरं होण्याचा विक्रम
राज्यात आज 26 हजार 408 रुग्णांची कोरोनावर मात
राज्यात आज 20 हजार 598 नव्या रुग्णांची भर
राज्यात आज कोरोनामुळे 455 रुग्णांचा मृत्यू
राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 73 टक्क्यांवर

7:30 pm (IST)

'आज संसदेत पास झालेली विधेयकं म्हणजे बळीराजाचा विजय'
काही जणांचा राजकीय आकसापोटी याला विरोध -प्रवीण दरेकर
या नव्या कायद्यामुळे दलाल हद्दपार होतील -प्रवीण दरेकर
या नव्या कायद्यांबद्दल मी केंद्राचं अभिनंदन करतो -दरेकर

6:47 pm (IST)

भाजपचे माजी आमदार प्रमोद जठारांचा शिवसेनेला इशारा
नाणार रिफायनरी कोकणातून जाणार नाही -प्रमोद जठार
'राज्य सरकार पडेल तेव्हा नाणारची अधिसूचना नव्यानं जाहीर होईल'
फडणवीस नवे सीएम म्हणून नाणारची अधिसूचना काढतील -जठार
नाणार रिफायनरी म्हणजे काही सेनेचा चहाचा कप नाही -प्रमोद जठार

6:30 pm (IST)

मराठा आरक्षण मुद्यानंतर धनगर समाज सरकारविरोधात आक्रमक
धनगर समाजाला अध्यादेश काढून आरक्षण देण्याची मागणी
परभणीपासून उद्यापासून आंदोलनाला होणार सुरुवात

6:21 pm (IST)

कृषी विधेयक कायदा केंद्रानं संमत करून चुकीचं केलंय -शेट्टी
'केंद्र सरकार हमीभावाच्या जबाबदारीतून मुक्त होऊ पाहतंय'
'कॉर्पोरेट कंपन्या शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला बांधील नाहीत'
'मग यातून आमच्या शेतकऱ्यांना हमीभाव कसे मिळणार?'
शेतकऱ्यांना यामधून काहीच मिळणार नाही -राजू शेट्टी

Load More
मुंबई, 20 सप्टेंबर : कोरोनाचे देशभरातील अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.