LIVE NOW

LIVE : मोदी सरकारविरोधात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचाही एल्गार, राष्ट्रवादीने दिला सक्रिय पाठिंबा

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

Lokmat.news18.com | December 2, 2020, 9:47 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated December 2, 2020
auto-refresh

Highlights

9:47 pm (IST)

मराठा समाजासाठी शैक्षणिक प्रवेश, आगामी नोकरभरतीसाठी जाहीर केलेल्या जागांच्या वर अतिरिक्त 12 टक्के जागांच्या पदांची निर्मिती करावी, या मागणीला सरकार सकारात्मक -संभाजीराजे छत्रपती

9:34 pm (IST)

केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या शेती विषयक कायद्याला विरोध करत पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने जोरदार आंदोलन छेडले आहे. हे आंदोलन मागे घेण्यास शेतकऱ्यांनी नकार दिल्यानंतर मोदी सरकारची डोकेदुखी वाढलेली आहे. अशातच या शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातूनही पाठिंबा देण्यात येत आहे.
'केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशस्तरावर शेतकरी संघटनांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनांला पाठिंबा देण्यासाठी 3 डिसेंबर 2020 रोजी महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना व कामगार संघटना राज्यभर आंदोलन करत आहेत. दिल्ली येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात होत असलेल्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सक्रिय पाठिंबा देत आहे,' अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

9:09 pm (IST)

राज्यात दिवसभरात 5,600 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 5,027 रुग्ण बरे
राज्यात दिवसभरात 111 रुग्णांचा मृत्यू
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 92.52 टक्के

9:02 pm (IST)

मराठा आरक्षणप्रश्नी 'वर्षा'वर महत्वाची बैठक
मुख्यमंत्री आणि संभाजीराजेंमध्ये झाली बैठक
मराठा आरक्षणप्रश्नी बैठकीत दोन तास चर्चा
अशोक चव्हाणही बैठकीला होते उपस्थित
एकनाथ शिंदे, अनिल परब होते उपस्थित
वळसे-पाटील, थोरातही होते उपस्थित
'11वी, 12वी प्रवेशाबाबत सकारात्मक चर्चा'
'प्रवेशाबाबत राखीव जागा तयार करणार'
मराठा समाजाच्या मुलांसाठी निर्णय

 

7:44 pm (IST)

पंढरपूर - शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रकरण, भाजप खासदार जयसिद्धेश्वर स्वामींवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा, सहाय्यक निवडणूक अधिकारी अनिकेत मानोरकरांकडून गुन्हा दाखल, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती मागणी

7:36 pm (IST)

राज्यपालांनी पंतप्रधान निवासस्थानी घेतली नरेंद्र मोदींची भेट, ही भेट औपचारिक -भगतसिंह कोश्यारी

6:52 pm (IST)

पश्चिम रेल्वेनं रद्द केलेली गाडी पुन्हा सुरू
प्रवाशांच्या रेल रोकोनंतर पश्चिम रेल्वेचा निर्णय
पालघर, डहाणूच्या प्रवाशांनी केलेलं आंदोलन

6:34 pm (IST)

काँग्रेसच्या सर्व आमदारांची उद्या‌ बैठक
विधानभवनात सकाळी 11 वाजता बैठक
कृषी विधेयकाविरोधात‌ ठराव मांडणार
राज्यभरातही उद्या काँग्रेसचं‌ आंदोलन

6:20 pm (IST)

'केंद्राचा सोयाबीन आयातीचा निर्णय'
त्यामुळे सोयाबीनचे भाव पडले -देशमुख
केंद्राशी राज्य चर्चा करणार -अनिल देशमुख
बॉलिवूड मुंबईबाहेर जाणं अशक्य -गृहमंत्री
'कोणी कितीही प्रयत्न करो, जमणार नाही'

5:53 pm (IST)

एसईबीसी संवर्गातील पदं वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देणार -महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Load More
मुंबई, 02 डिसेंबर : कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स