• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • LIVE : मुंबईच्या महापौर पेडणेकर यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

LIVE : मुंबईच्या महापौर पेडणेकर यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 19, 2020, 16:42 IST
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  23:12 (IST)

  चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात राजस्थानने बाजी मारली आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वाखालील चेन्नईला आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईने दिलेल्या 126 धावांचा राजस्थानने 3 विकेट्स गमावून यशस्वी पाठलाग केला. आणखी एका पराभवामुळे यंदाच्या सीझनमध्ये चेन्नईच्या आशा साखळी सामन्यांमध्येच गारद होण्याची शक्यता आहे. 

  21:38 (IST)

  कोल्हापूर - यंदाचा शाही दसरा उत्सव रद्द
  दसरा चौक मैदानावरचा सीमोल्लंघनाचा कार्यक्रम रद्द
  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक शाही दसरा रद्द
  छत्रपती शाहू महाराज चॅरिटेबल ट्रस्टचा निर्णय
  कोल्हापूरकरांना दसरा साधेपणानं करण्याचं आवाहन

  21:0 (IST)

  दक्षिण आशिया, दक्षिण भारतावर अवेळी पावसाचं मोठं संकट, पुढचे 4 महिने दक्षिण आशियात पाऊस घालू शकतो धुमशान? ऑगस्टपासून दक्षिण आशियावर 'ला निना'चा प्रभाव

  20:43 (IST)

  कोरोना संकटात राज्यासाठी दिलासादायक बातमी
  गेल्या कित्येक महिन्यात सर्वात कमी रुग्णांची नोंद
  राज्यात कोरोना मृत्यूच्या संख्येत लक्षणीय घट
  राज्यात आज 125 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
  राज्यात आज कोरोनाचे 5,984 नवे रुग्ण
  राज्यात आज 15 हजार 69 रुग्ण बरे होऊन घरी
  राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 86.48 टक्के

  20:13 (IST)

  पुणे शहरात मायक्रो कंटेन्मेंट झोनची पुनर्रचना, आता अवघे 33 मायक्रो कंटेन्मेंट झोन

  19:48 (IST)

  पुण्यात दिवसभरात 214 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
  पुण्यात दिवसभरात 505 रुग्णांना डिस्चार्ज
  पुण्यात दिवसभरात 27 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
  पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 9 हजार 198

  19:29 (IST)

  सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करून प्रलंबित कामं गतिमान करावीत, मिठी नदी विकास प्रकल्पासह विविध कामांचा आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा

  19:21 (IST)

  देवेंद्र फडणवीस उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर
  अतिवृष्टीनं नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी
  फडणवीसांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद

  19:9 (IST)

  सातारा : महाबळेश्वर-पाचगणी येथील पर्यटन सशर्त सुरू, वेण्णालेकवरील बोटिंग आणि घोडेस्वारी सुरू करण्यास परवानगी, सातारा जिल्हा अधिकारी शेखरसिंह यांनी दिले आदेश, पर्यटन खुलं केल्यानं व्यावसायिक आणि नागरिकांत समाधान

  18:31 (IST)

  सर्वसामान्य महिलांसाठी रेल्वे सुरू करावी यासाठी रेल्वेनं ज्या अटी-शर्ती लागू केल्या आहेत त्याबाबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत चर्चा करणार -अस्लम शेख

  मुंबई, 19 ऑक्टोबर : कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स