LIVE NOW

LIVE: दोन्ही सरकार एकाच माळेचे मनी, खासदार इम्तियाज जलील यांची जहरी टीका

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर

Lokmat.news18.com | October 17, 2020, 10:10 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated October 17, 2020
auto-refresh

Highlights

10:10 pm (IST)

अमित शाह यांची मुलाखत संपल्यानंतर
रात्री 10 च्या बातम्यांमधील ब्रेकिंग न्यूज
अमित शाह यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
'न्यूज18 नेटवर्क'ला दिली एक्सक्लुझिव्ह मुलाखत
'एडिटर इन चीफ' राहुल जोशींनी घेतली मुलाखत
राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं पत्र
'त्या' वादग्रस्त पत्रावरून अमित शाहांची नाराजी
राज्यपालांनी वापरलेल्या शब्दांबद्दल नापसंती व्यक्त
'शब्द वापरताना सावधानता बाळगायला हवी होती'
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर भाष्य
'टीआरपीसाठी सुशांतची मीडिया ट्रायल योग्य नव्हती'
'भाजपमुळे सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाला वाचा'
'तपास आधीच सीबीआयकडे द्यायला हवा होता'

8:40 pm (IST)

दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यात जिम सुरू होणार -मुख्यमंत्री
जिम, व्यायामशाळा, फिटनेस सेंटर सुरू करण्यास मान्यता
एसओपीचं काटेकोर पालन करा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सामूहिक व्यायाम प्रकार झुम्बा, स्टिम, सौना बाथ बंदच

7:50 pm (IST)

एसओपीचे काटेकोर पालन करून दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातल्या जिम, व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटर सुरू करण्यास राज्य सरकारची परवानगी; जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायामशाळा प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मान्यता मात्र सामूहिक व्यायाम प्रकार झुम्बा, स्टिम, सौना बाथ बंद राहणार

7:29 pm (IST)

अभिनेत्री कंगना राणावतच्या अडचणीत वाढ
कंगनासह बहीण रंगोलीविरोधात एफआयआर दाखल
कोर्टाच्या आदेशानंतर वांद्रे पोलिसांनी दाखल केला गुन्हा
ट्विटच्या माध्यमातून धार्मिक तेढ पसरवल्याचा आरोप

6:53 pm (IST)

सर्वांना मेट्रोमधून प्रवास करण्यास परवानगी
22 मार्चनंतर स्मार्ट संपलेल्यांनाही मुभा
स्मार्ड कार्डचे पैसे वाया जाणार नाहीत
सोमवारपासून मेट्रोच्या रोज 200 फेऱ्या
मेट्रो स्टेशनवर 15 ऐवजी 30 सेकंद थांबणार 

6:35 pm (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार पूरग्रस्त भागांचा दौरा
सोमवारपासून मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात दौरा
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारीही उपस्थित राहणार
नुकसान पाहणीनंतर मुख्यमंत्री जाहीर करणार मदत?
पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत जाहीर करण्याची शक्यता

6:21 pm (IST)

मेट्रोमधून सर्वांना प्रवास करण्यास परवानगी
22 मार्चनंतर स्मार्ट संपलेल्यांना स्मार्ट वापरता येणार
एकही दिवसाचे पैसे वाया जाणार नाही
मेट्रोच्या रोज 200 फेऱ्या धावणार
मेट्रो स्टेशनवर 15 ऐवजी 30 सेकंद थांबणार

6:21 pm (IST)

'कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना पुन्हा चाचण्या कमी'
मुंबईत 2 टक्क्यांनी वाढले कोरोना रुग्ण -देवेंद्र फडणवीस
'राज्यात प्रतिदिन चाचण्या 92 हजारांवरून 75 हजारांवर'
फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना चाचण्या वाढीसाठी पुन्हा पत्र
'कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर लक्ष केंद्रित करा'

6:21 pm (IST)

जळगाव-रावेरच्या बोरखेडातील चौघांचं हत्याकांड प्रकरण
गृहमंत्री अनिल देशमुखांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेही होते उपस्थित
'रावेरच्या बोरखेडा शिवारात घडलेलं हत्याकांड दुर्दैवी'
मानवतेला काळिमा फासणारी घटना -अनिल देशमुख
'बोरखेडा हत्याकांडाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात'
'विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांची नियुक्ती'
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

4:13 pm (IST)

जळगाव - रावेरमधील 4 मुलांचं हत्याकांड
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख रावेरमध्ये
विश्रामगृहात देशमुख आणि खडसेंची भेट
देशमुख-खडसे भेटीबाबत पूर्णपणे गुप्तता
देशमुख-खडसे एकाच गाडीतून घटनास्थळी

Load More
मुंबई, 17 ऑक्टोबर : कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर