विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-शिवसेनेची युती तुटली आणि शिवसेनेनं आपला वेगळा मार्ग निवडला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर भाजप शिवसेनेविरोधात आक्रमक झाला. नुकतंच चर्चेत असलेल्या कंगना रणौत प्रकरणातही भाजपने शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली.