LIVE : नाशिकमध्ये अन्न, औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई; शहरातील विविध भागांमध्ये टाकला छापा

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 14, 2020, 22:04 IST
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:59 (IST)

  नाशिक BREAKING : 

  -  अन्न,औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई
  - प्रतिबंधित अन्न पदार्थांवर छापा टाकून 1 कोटी 48 लाख 36 हजार 138 रुपयांचे अन्न पदार्थ जप्त
  - शहरातील विविध भागात केली कारवाई
  - खाद्य तेल,मिठाई,वनस्पती अशा प्रकारचे अन्न पदार्थ केले जप्त

  18:2 (IST)

  कोल्हापूर-आजरा तालुक्यातील जवानाला वीरमरण
  पाकिस्तानच्या गोळीबारात ऋषिकेश जोंधळे शहीद
  शहीद ऋषिकेश यांचं पार्थिव अजूनही जम्मूमध्ये
  उद्या अंत्यसंस्कार होणार की नाही याबाबत साशंकता 
  आजराच्या बहिरेवाडी गावात होणार आहे अंत्यसंस्कार
  पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार होण्याची शक्यता 

  15:33 (IST)

  'सोमवारपासून राज्यातील मंदिरं उघडणार'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
  'पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरं खुली होणार'
  'सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळं खुली करणार'
  'नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार'
  इतर धार्मिक स्थळंही उघडणार -मुख्यमंत्री
  'गर्दी टाळा, स्वतःसोबत इतरांचंही रक्षण करा'
  'हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं'ची इच्छा'
  'शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद मिळतील'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

  12:9 (IST)

  भारताची परीक्षा बघू नका -नरेंद्र मोदी
  'कुरापती करणाऱ्यांना तगडं उत्तर देणार'

  11:47 (IST)

  लोंगेवालावर लष्करानं इतिहास रचला -मोदी
  भारताची शौर्यगाथा देशासमोर -नरेंद्र मोदी

  11:44 (IST)

  1971 चा विजय साजरा करणार -मोदी
  'भारतीय जवानांनी पाकला धूळ चारली'

  11:34 (IST)

  पंतप्रधान मोदींची दिवाळी सीमेवर
  पंतप्रधान मोदी लोंगेवाला सीमेवर
  पंतप्रधानांची दिवाळी जवानांसोबत
  तुम्ही आहात म्हणून देश आहे -मोदी
  वीरमाता, वीरपत्नींना सलाम -मोदी
  जवानांसाठी देशवासीयांचं प्रेम -मोदी
  'जवानांशिवाय माझी दिवाळी अपूर्ण'
  लष्करी जवान माझं कुटुंब -मोदी

  10:58 (IST)

  आमदार रवी राणांचं अन्नत्याग आंदोलन
  अमरावतीच्या तुरुंगात राणांचं आंदोलन
  राणांसह 20 शेतकरी अमरावती जेलमध्ये
  शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी 

  10:54 (IST)

  'मविआ' सरकार 5 वर्षं टिकणार -संजय राऊत
  महाराष्ट्राला अधिक मजबूत करणार -राऊत
  विरोधकांनी टीका करावी -संजय राऊत
  खोटे आरोप करणं बंद करावं -संजय राऊत

  10:29 (IST)


  अकोला - MIDCतील कंपनीला आग
  विदर्भ ट्रेडिंग कंपनीत भीषण आग
  आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
  आगीचं कारण अजून अस्पष्ट

  कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स