• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • LIVE : पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LIVE : पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देशासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा...

 • News18 Lokmat
 • | January 01, 2021, 20:35 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:17 (IST)

  नागपूर - वाघिणीसह 2 बछडे मृतावस्थेत आढळले
  उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील घटना

  20:28 (IST)

  पर्यावरणाचं संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी, माझी वसुंधरा ई-शपथ उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, उद्धव ठाकरेंसह उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, पर्यावरण मंत्री आदी विविध मान्यवरांनी घेतली पर्यावरण संवर्धनाची ई-शपथ

  18:35 (IST)

  HDIL उपकंपनीचे संचालक प्रवीण राऊतांची 72 कोटींची संपत्ती जप्त, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई

  18:9 (IST)

  नागपूर - 6 जानेवारीपासून पुढील 30 दिवसांसाठी नागपूर शहरातील 65% भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा करणार, पेंचमधून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये मोठं लिकेज दुरुस्त करण्यासाठी महापालिकेचा निर्णय, नागपूरकरांनी पाण्याचं नियोजन करावं -मनपा

  17:57 (IST)

  पुणे शहरातील नव्यानं आढळून येणारी कोरोनाबाधित रुग्णसंख्या घटत असल्यानं आजपासून पुणे महापालिका हद्दीत एकही कंटेन्मेंट झोन नसेल, कोरोना संसर्गाची तीव्रता निश्चितच कमी झालीय, मात्र संकट अजूनही टळलेलं नाही, त्यामुळे काळजी कायम घेऊयात -महापौर

  17:35 (IST)

  'माझी वसुंधरा ई-शपथ' उपक्रमाचा शुभारंभ
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद‌्घाटन
  पर्यावरण रक्षणासाठी सहभागी होण्याचं आवाहन

  17:27 (IST)

  नागपूर - शाळा सुरू करताना शिक्षकांची कोरोना टेस्ट करणं आवश्यक आहे, ती केली जात आहे, 4 तारखेपासून शाळा सुरू होणार,
  16,000 पालकांनी संमतीपत्रं दिली - मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.

  17:24 (IST)

  कोरोना लसीसंदर्भात सर्वात मोठी बातमी
  सिरमच्या लसीची काही अटींवर शिफारस
  कोविशिल्ड लसीला परवानगीची शक्यता

  17:13 (IST)

  विरोधी पक्षनेत्याचं स्वागत करतो, विकासकामांसाठी एकत्र येऊ, जम्बो रुग्णालय आजपासून तात्पुरतं बंद करतोय, गरज लागल्यास परत सुरू करू -अजित पवार

  17:8 (IST)

  'नामकरणाला काँग्रेसचा सातत्यानं विरोध'
  नाव बदलून काय साध्य होणार? -थोरात
  'सर्वसामान्याचं जीवन कसं बदलेल हे पाहावं'
  औरंगाबादच्या नामकरणाचा वाद
  आघाडीत बिघाडी नाही -बाळासाहेब थोरात
  'छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज आमचे दैवत'
  'निवडणूक आली की भावनेचं राजकारण'
  मनसे आणि भाजपवर थोरातांची टीका

  नवी दिल्ली, 1 जानेवारी : देशासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा...