LIVE NOW

LIVE : दगडूशेठ गणपतीला भावपूर्ण निरोप; जागेवरच झालं विसर्जन

देशासह राज्यातील कोरोनाचे अपडेट्स आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा सविस्तर.

Lokmat.news18.com | September 1, 2020, 10:13 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated September 1, 2020
auto-refresh

Highlights

10:13 pm (IST)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कधीही पोहोचू शकते शौविककडे
ड्रग्ज डिलर हा शौविकच्या थेट संपर्कात होता
शौविकनं ड्रग्ज डिलरकडून अंमली पदार्थ विकत घेतले
शौविकनं अंमली पदार्थ विकल्याचाही NCB ला संशय

 

9:53 pm (IST)

राज्यात आज 15 हजार 765 नवीन रुग्णांची भर
राज्यात आज 10 हजार 978 रुग्ण कोरोनामुक्त
राज्याचं रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 72.32 टक्के
राज्यभरात सध्या 1 लाख 98,523 रुग्ण अॅक्टिव्ह
राज्यात एकूण 5 लाख 84,537 रुग्ण कोरोनामुक्त

9:53 pm (IST)

रिया चक्रवर्तीच्या तपासात मोठी माहिती हाती
रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीचं ड्रग्ज कनेक्शन समोर
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं ड्रग डिलरला केलं जेरबंद

 

9:45 pm (IST)

रिया चक्रवर्तीच्या तपासात मोठी माहिती हाती
रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीचं ड्रग्ज कनेक्शन समोर
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं ड्रग डिलरला केलं जेरबंद

 

9:44 pm (IST)

अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेण्यासाठी उद्या बैठक
उदय सामंत, राजीव जलोटा उद्या स.11 वा. भेट घेणार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची घेणार भेट
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करून केलेली कार्यवाही
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाबाबतच्या भावना
सर्व कुलगुरूंसोबतल्या चर्चेची माहिती राज्यपालांना देणार

 

9:44 pm (IST)

अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेण्यासाठी उद्या बैठक
उदय सामंत, राजीव जलोटा उद्या स.11 वा. भेट घेणार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची घेणार भेट
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करून केलेली कार्यवाही
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाबाबतच्या भावना
सर्व कुलगुरूंसोबतल्या चर्चेची माहिती राज्यपालांना देणार

 

8:55 pm (IST)

देवेंद्र फडणवीस 2, 3 तारखेला पूरग्रस्त पूर्व विदर्भ दौऱ्यावर; भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला भेट देऊन आढावा घेणार

8:53 pm (IST)

चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब 10 हजारांची तातडीची मदत देणार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवारांची घोषणा, पुढील 2 ते 3 दिवसांत पूरग्रस्तांच्या खात्यात जमा करणार पैसे
चंद्रपूर जिल्ह्यातील 8 ते 9 हजार कुटुंबीयांना मिळणार मदत, त्यानंतर सर्व्हे करून पूर्णतः उद‌्ध्वस्त झालेल्या घरांना 95 हजार, दुरुस्तीसाठी 50 हजार आणि अंशतः पडझड झाली असेल तर 15 हजार देणार, पूरग्रस्तांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत काँग्रेस कार्यकर्ते लोकांची भोजनव्यवस्था करणार -विजय वडेट्टीवार
चंद्रपूर - पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 18 हजारांची मदत देणार, परवापासून शेताच्या पंचनाम्यांना सुरुवात होणार, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 18 हजार मदत देणार आणि तोच निकष सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही लागू करणार

 

8:43 pm (IST)

कोरोनाचं आणि आर्थिक संकट दूर करण्याचं श्रीगणरायाला निरोप देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं साकडं

नियम पाळून, संसर्ग टाळून, शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी मानले सर्व गणेशभक्तांचे, गणेश मंडळांचे जाहीर आभार

8:31 pm (IST)

नाशिक - विसर्जनाला गालबोट, जिल्ह्यात 5 तरुणांचा मृत्यू
चौघांचा विसर्जनादरम्यान नदीत आणि विहिरीत मृत्यू
इगतपुरीला दरीच्या तोंडावर एकाचा सेल्फी घेताना मृत्यू
250 फूट खोल दरीत कोसळलेला शेखर गवळी हा रणजीपटू
मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी शेखर इगतपुरीला गेला होता
भुसावळ - विसर्जनादरम्यान 5 तरुण तापी नदीपात्रात बुडाले
स्थानिकांनी 5 पैकी 3 जणांना वाचवलं, दोघांचा शोध सुरू
झेडटीएसच्या रेल्वे पुलाजवळची दुर्दैवी घटना

 

Load More
मुंबई, 01 सप्टेंबर : देशासह राज्यातील कोरोनाचे अपडेट्स आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा सविस्तर.