News18 Lokmat

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांकडून महाआघाडीचा प्रस्ताव

2019मधल्या विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांकडून महाआघाडीचा प्रस्ताव मांडण्यात आलाय, अशी महत्त्वाची बातमी सूत्रांकडून मिळतेय. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, रिपाई कवाडे,गवई गट, सपा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बहुजन विकास आघाडी गटासोबत आघाडीचा हा प्रस्ताव आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2018 04:29 PM IST

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांकडून महाआघाडीचा प्रस्ताव

11 जून : 2019मधल्या विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांकडून महाआघाडीचा प्रस्ताव मांडण्यात आलाय, अशी महत्त्वाची बातमी सूत्रांकडून मिळतेय. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, रिपाई कवाडे,गवई गट, सपा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बहुजन विकास आघाडी गटासोबत आघाडीचा हा प्रस्ताव आहे. आघाडीबाबत पवारांनी रविवारच्या वर्धापन दिन सोहळ्यात आवाहन केलं होतं.असा प्रस्ताव पवारांनी राहुल गांधींना पाठवला.

विधानसभेच्या 288 जागांपैकी 131 -131 जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवतील. आणि 26 जागा इतर सहयोगी पक्षांना दिल्या जातील.

त्यावर राहुल गांधी आणि महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांमध्ये उद्या चर्चा होणार आहे, असंही समजतंय. कारण राहुल गांधी उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2018 01:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...