Home /News /national /

या राज्यातून महाराष्ट्रात जाण्या-येण्यावर निर्बंध; कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता बससेवा केली बंद

या राज्यातून महाराष्ट्रात जाण्या-येण्यावर निर्बंध; कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता बससेवा केली बंद

Maharashtra MP bus services suspended : 20 मार्चपासून दोन राज्यांतील बससेवा बंद होईल.

    मुंबई, 18 मार्च : कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात (Coronavirus in maharashtra)  आहेत. त्यामुळे आता कोरोनाला आवरण्यासाठी कठोर निर्बंध घातले जात आहेत. राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर कडक नियम तयार करण्यात आले आहेत, काही ठिकाणी नाईट कर्फ्यूही लागू करण्यात आला आहे. दरम्यान आता महाराष्ट्राजवळील राज्यांनीदेखील खबरदारी घ्यायाला सुरुवात केली आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बससेवा बंद (MP Maharashtra bus services suspended) कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप पाहायला मिळतो आहेत. त्यामुळे मध्य प्रदेश सरकारने  महाराष्ट्रात येण्या-जाण्यावर निर्बंध घातले आहेत. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बससेवा बंद ठेवली जाणार आहे. 20 मार्चपासून बससेवा बंद होईल. त्यामुळे या दोन्ही राज्यात जाता येता येणार नाही. हे वाचा - कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन संध्याकाळी बंद; शुक्रवारपासून वेळेत बदल फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या आकड्यांचा आलेख वेगाने वाढतो आहे. गुरुवारी या संख्येने कहर केला आणि महाराष्ट्रात नवीन रुग्णसंख्येच्या सप्टेंबरच्या आकड्यालाही मागे टाकलं. गेल्या 24 तासांत राज्यात 25833 नवे रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. पुणे महानगरपालिकेच्या (Coronavirus pune data) आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत एकट्या पुणे शहरातच 2752 नव्या रुग्णांंची भर पडली आहे तर 28 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत पुण्यात कोरोनाबळींच्या संख्येने 5 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत या साथीने शहरात 5002 जणांचा बळी घेतला आहे. राज्यात का वाढतोय कोरोना? Maharashtra covid task force चे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामागे दोनच ठळक कारणं आहेत. कोविड नियम लोक गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. रेस्टॉरंट्समध्ये विनामास्क जाणारे नागरिक हे कोरोनाच्या प्रसारामागचं प्रमुख कारण असल्याचं डॉक्टर सांगतात. हे वाचा - ...तर पीपीई किट घालून द्यावी लागेल MPSC ची परीक्षा; पर्यवेक्षकांसाठीही नियम महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना केसेसमध्ये समोर आलेली आणखी एक बाब म्हणजे अँटिबॉडीजची संख्या झपाट्याने कमी होते आहे. एकदा या विषाणूचा हल्ला परतवून लावला तरी पुन्हा कोरोनाची लागण झालेले रुग्ण दिसू लागले आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हलगर्जीपणा करून चालणार नाही. कोरोना लसीकरण वाढलं, तसं लोकही बिनधास्त घराबाहेर पडू लागले आहेत. पण लस घेतल्यानंतरही कोरोना नियम पाळावेच लागतील. लशीचा परिणाम लगेच सुरू होत नाही. शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे लसीकरणानंतर 2 महिने काळजी घेत राहणं आवश्यक आहे, असंही जोशी यांनी सांगितलं.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या