मराठी बातम्या /बातम्या /देश /महाराष्ट्राने आणखी एक वीरपुत्र गमावला; चाळीसगावातील 21 वर्षीय यश देशमुख काश्मीरमध्ये शहीद

महाराष्ट्राने आणखी एक वीरपुत्र गमावला; चाळीसगावातील 21 वर्षीय यश देशमुख काश्मीरमध्ये शहीद

यश यांची बातमी समोर आल्यानंतर गावात एकही चूल पेटली नसून दहशतवाद्याच्या हल्ल्याचा सर्वांकडून निषेध केला जात आहे.

यश यांची बातमी समोर आल्यानंतर गावात एकही चूल पेटली नसून दहशतवाद्याच्या हल्ल्याचा सर्वांकडून निषेध केला जात आहे.

यश यांची बातमी समोर आल्यानंतर गावात एकही चूल पेटली नसून दहशतवाद्याच्या हल्ल्याचा सर्वांकडून निषेध केला जात आहे.

जळगाव, 26 नोव्हेंबर : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) आणखी एका जवानाला वीरमरण आलं आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील एक जवान शहीद झाले आहेत. काश्मीरमधील श्रीनगर येथे दहशतवाद्यांचा भारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान शहीद यश दिगंबर देशमुख (Yash Digambar Deshmukh) शहीद झाले असून ते 21 वर्षांचे आहेत.

आज दुपारी 2 वाजता त्यांना वीरमरण आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वर्षभरापूर्वी यश हे सैन्यदलात भरती झाले होते. ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलं होतं. आज दुपारी शत्रूविरोधात लढा देत असताना त्यांना वीरमरण आहे. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

यश देशमुख यांच्या मागे त्यांचे आई-वडील आणि एक भाऊ असं कुटुंब आहे. त्यांच्या शहीद होण्याची बातमी गावात कळताच सर्वत्र शोककळा पसरली. अद्याप त्यांच्या आई-वडिलांना मुलगा शहीद झाल्याचे सांगण्यात आलेले नाही. यश यांच्या निधनाच्या बातमीनंतर गावात एकही चूल पेटली नसून दहशतवाद्याच्या हल्ल्याचा सर्वांकडून निषेध केला जात आहे.

हे ही वाचा-8 महिन्यात 8 हत्या आणि 6 हजारांचा बळी; कुख्यात गँगस्टरचा मोठा होता प्लान

देशात एकीकडे संविधान दिन साजरा केला जात आहे. मुंबईतील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला 12 वर्ष पूर्ण होत असतानाच श्रीनगरमधून मोठी बातमी येत आहे. श्रीनगर परिसरात दहशतवाद्यांनी पुन्हा भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. श्रीनगरमधील HMT परिसरात सुरक्षा दलाच्या टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या परिसरात सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन जारी असून परिसरात ज्यादा कुमक तैनात करण्यात आली आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.दहशतवाद्यांनी परिमपुरा परिसरातील खुशीपुरा येथे सुरक्षा दलावर गोळीबार केला. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी त्या परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली आहे. या घटनेवर काश्मीरचे आयजी म्हणाले की तीन दहशतवाद्यांनी सैन्याच्या जवानांवर गोळीबार केला. ज्यामध्ये दोन सैनिक गंभीर जखमी झाले त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत ते शहीद झाले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात जैशचा हात आहे.

First published:

Tags: Jammu and kashmir