नव्या सर्व्हेने मोदींची चिंता वाढवली, NDA बहुमतापासून दूर

ओपिनियन पोलमधून देशातील जनतेच्या मनात काय चाललंय, याबाबतचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता एका खासगी वृत्तवाहिनी आणि सी-वोटर यांनी लोकसभा निवडणुकांबाबत केलेला सर्व्हे समोर आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2019 07:36 PM IST

नव्या सर्व्हेने मोदींची चिंता वाढवली, NDA बहुमतापासून दूर

नवी दिल्ली, 7 एप्रिल :  लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रत्येक पक्ष जोर लावताना दिसत आहे. अशातच काही ओपिनियन पोलमधून देशातील जनतेच्या मनात काय चाललंय, याबाबतचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता एका खासगी वृत्तवाहिनी आणि सी-वोटर यांनी लोकसभा निवडणुकांबाबत केलेला सर्व्हे समोर आला आहे.

कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळणार नाही, असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. या सर्व्हेनुसार, देशात भाजपप्रणित एनडीएला 267 जागा मिळताना दिसत आहे. म्हणजे पुन्हा पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मोदींसाठी हा धक्का आहे. कारण बहुमतासाठी 272 जागांची आवश्यकता असते.

दुसरीकडे, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएसाठीही या सर्व्हेतील निष्कर्ष फारसा आनंद देणारा नाही. कारण युपीएला फक्त 142 जागांचा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. तर इतरांच्या जागांमध्ये मात्र लक्षणीय वाढ झाली असल्याचं चित्र आहे. इतर पक्षांना 134 जागा मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

प्रत्येक आघाडीला मिळालेल्या मतदानाच्या टक्केवारीच्या विचार केला तर, एनडीएला 42 टक्के, युपीएला 31 टक्के तर इतरांना 27 टक्के मते मिळतील, असं या ओपिनियन पोलमधून समोर आलं आहे.


Loading...

मोकाट वळूने रस्त्यावरच उचलून फेकल्याने नागरिकाचा मृत्यू, भयानक VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2019 07:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...