मराठी बातम्या /बातम्या /देश /

सिंचन घोटाळ्याचं भूत बाटलीबाहेर? गडकरी आऊट, फडणवीस इन! सुरतमध्ये 'जलप्रलय' TOP बातम्या

सिंचन घोटाळ्याचं भूत बाटलीबाहेर? गडकरी आऊट, फडणवीस इन! सुरतमध्ये 'जलप्रलय' TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

  • Published by:  Rahul Punde
मुंबई, 18 ऑगस्ट : राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. यापूर्वी मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याबाबत ट्वीट करून खळबळ उडवून दिली होती. सिंचन घोटाळ्याचं (Irrigation Scam) भूत पुन्हा एकदा बाटलीबाहेर आलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात पुराचा मोठा फटका बसला आहे. तर तिकडे सुरतमध्येही 48 तासांत विक्रमी पाऊस बरसला आहे. देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा. मोहित कंबोज-रश्मी शुक्ला फडणवीसांच्या भेटीला राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) आणि आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्या आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. सिंचन घोटाळ्याचं भूत पुन्हा बाटलीबाहेर सिंचन घोटाळ्याचं (Irrigation Scam) भूत पुन्हा एकदा बाटलीबाहेर आलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar Clean Chit) यांच्या सिंचन घोटाळा प्रकरणीचा क्लीन चीटचा अहवाल उच्च न्यायालयाने (High Court) स्वीकारलेला नाही. उच्च न्यायालयासमोर हा अहवाल अजूनही प्रलंबित असल्याची माहिती आता समोर आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. विनायक मेटेंचा मृत्यू अपघात का घातपाताने? मुख्यमंत्र्यांचे CID चौकशीचे आदेश शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना रजनीश सेठ यांना दिलेले आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. 'अहो बांगर, सबुरीने घ्या', एकनाथ शिंदेंचा मोलाचा सल्ला एकनाथ शिंदे यांची त्यांच्या गटाच्या आमदारांसोबत आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी आमदारांना मोलाचा सल्ला दिला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. गडकरी आऊट, फडणवीस इन! भाजपचे (BJP Committee) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी पक्षाच्या संसदीय आणि निवडणूक समितीच्या नावाची घोषणा केली आहे. संसदीय समिती आणि निवडणूक समितीमधून नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचं नाव वगळण्यात आलं आहे. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा समावेश निवडणूक समितीमध्ये करण्यात आला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. चार दिवस भामरागडमध्ये पाणीच पाणी गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुका राज्याच्या (Gadchiroli Bhamragad Rain) सीमेवरील अतिदुर्गम तालुका आहे. गेले चार दिवस पामुलगौतम आणि पुर्लकोटा नदीला आलेल्या पुराचा भामरागडला फटका बसून चारही बाजूने गावात पुराच पाणी गेले होते. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.  सुरतमध्ये 'जलप्रलय'! 48 तासांत 15 इंच विक्रमी पाऊस! गुजरातच्या विविध भागात मुसळधार पावसाने कहर सुरूच ठेवला आहे. औद्योगिक शहर सूरतमध्ये गेल्या 48 तासांत 15 इंचांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले होते. यानंतर बाधित भागातून लोकांना बोटीद्वारे बाहेर काढण्यात आले. हवामान विभागाने बुधवारी गुजरातमधील आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि सात जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला. दक्षिण गुजरातमधील तीन जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. विमान प्रवासाबाबत DGCA चे कडक नियम देशभरात कोरोना रुग्णांच्या (Corona Virus) संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये कोरोनाचा (Covid-19) आलेख चढता आहे, याची गंभीर दखल डीजीसीए (DGCA) म्हणजेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने घेतली आहे. डीजीसीएने विमान प्रवासाबाबत नव्या गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्या आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
First published:

Tags: Monsoon, Rain flood

पुढील बातम्या