अजित पवारांच्या पत्रात असं काय होत की, ज्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले!

अजित पवारांच्या पत्रात असं काय होत की, ज्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले!

अजित पवार यांची भाजप सोबत जाण्याची बाजू प्रथमच समोर आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर: महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालय उद्या सकाळी अंतिम निर्णय देणार आहे. कोर्टाच्या या निर्णामुळे राज्यातील सत्ता संघर्षाचे नाट्य इतक्या लवकर संपणार नाही हे स्पष्ट झाले आहे. आज कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान, भाजप आणि अजित पवार यांनी त्यांची बाजू मांडली तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी देखील यासंदर्भात स्वत:ची भूमिका कोर्टाला सांगितली. दोन्ही पक्षांच्या या युक्तीवादात अजित पवार यांची भाजप सोबत जाण्याची बाजू प्रथमच समोर आली आहे.

राज्यपालांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिल्यानंतर पवारांनी राष्ट्रवादीमधील एका मोठ्या गटाला फोडल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर ही दोन दिवश अजित पवार यांच्या सोबत किती आमदार आहेत याची चर्चा सुरु झाली होती. आज कोर्टात अजित पवारांनी राज्यपालांना दिलेल्या पत्राचा खुलासा झाला. या पत्रात अजित पवार यांनी सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देत असल्याचे देखील म्हटले आहे. विशेष म्हणजे पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व 54 आमदारांची स्वाक्षरी देखील आहे. राज्यात अधिक काळ राष्ट्रपती राजवट राहू नये अशी माझी इच्छा आाहे आणि त्यामुळेच भाजपला पाठिंबा देत असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. या पत्रात पवारांनी मीच राष्ट्रवादीचा गटनेता असून माझ्यासोबत सर्व 54 आमदार आहेत, पवार यांनी सांगितले आहे.

अजित पवार यांनी राज्यपालांना दिलेले पत्र 22 तारखेचे आहे. हे पत्र महाधिवक्ता तुषार मेहता यांनी कोर्टात वाचून दाखवले. कोर्टात झालेल्या सुनावणीत अजित पवार यांचे पत्र हा एक महत्त्वाचा उक्तीवाद ठरला. राज्यपालांनी चुकीच्या पद्धतीने शपधविधी घेतल्याचा दावा विरोधकांनी घेतला होता. त्यावर उत्तर देताना मेहता यांनी सांगितले की, अजित पवारांनी दिलेल्या पत्राच्या आधारावरच राज्यपालांनी शपधविधी घेतल्याचा दावा मेहता यांनी केला. फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा पाठिंबा आहे. एक पवार आमच्या सोबत आहे तर दुसरे विरोधात. पवारांच्या कुटुंबातील वादाशी आम्हाला देणेघेणए नाही असे रोहतगी यांनी कोर्टाला सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2019 01:00 PM IST

ताज्या बातम्या