'चोर दरवाजाने मुंबईवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाला', केंद्रीय मंत्र्यांचा आरोप

'चोर दरवाजाने मुंबईवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाला', केंद्रीय मंत्र्यांचा आरोप

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका स्पष्ट केलीय. त्यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 23 नोव्हेंबर : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका स्पष्ट केलीय. भाजप महाराष्ट्राला स्थिर आणि प्रामाणिक सरकार देईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.शिवसेना भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा दावा करणार होती ही लोकशाहीची हत्या नाही का, असा सवालही त्यांनी विचारला.

'मुंबईवर ताबा मिळवण्याचा डाव'

देशाच्या आर्थिक राजधानीवर ताबा मिळवण्याचा काहीजणांचा प्रयत्न होता, असा थेट आरोप त्यांनी केला. ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा आदर्श राखला नाही त्यांच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही, असंही रविशंकर प्रसाद म्हणाले.

राज्यपालांनी भाजपसोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही बोलवलं होतं. शिवसेना गेल्या 25 दिवसांपासून सत्तास्थापनेचा दावा करतेय पण ते सरकार बनवू शकले नाहीत याची आठवण त्यांनी करून दिली.

भाजपला जनमताचा कौल असतानाही भाजपने सरकार का बनवलं नाही, असं जनता विचारत होती, असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनाही जनतेने निवडलं होतं या मुद्द्यावर त्यांनी भर दिला.

(हेही वाचा : शपथविधी झाला पण सरकारचं काय होणार? या आहेत 3 शक्यता)

शिवसेनेने सरकार का बनवलं नाही?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात जी टीका केली गेली ती आम्हाला सहन करावी लागली हे सांगायलाही रविशंकर प्रसाद विसरले नाहीत.

त्याआधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली आणि सरकारस्थापनेच्या विरोधात राजकीय आणि कायदेशीर लढाई देऊ, असं त्यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनातल्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. आता भाजप सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

=============================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: November 23, 2019, 3:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading