'एक्झिट पोल' काहीही असो, नांदेडमध्ये काँग्रेसच जिंकणार - अशोक चव्हाण

'एक्झिट पोल' काहीही असो, नांदेडमध्ये काँग्रेसच जिंकणार - अशोक चव्हाण

'एक्झिट पोल हे फक्त अंदाज आहेत. खरी परिस्थिती मतमोजणी नंतर स्पष्ट होईल. आघाडीच मारणार बाजी.'

  • Share this:

मुंबई 19 मे :  लोकसभा निवडणुकीच्या  एक्झिट पोलवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. एक्झिट पोल हे फक्त अंदाज आहेत. खरी परिस्थिती मतमोजणी नंतर स्पष्ट होईल असं अशोक चव्हाण म्हणाले. एक्झिट पोलसाठी किती जणांची मतं जाणून घेतली. किती लोकांना विचारण्यात आलं त्यावरच हे अवलंबून आहे असंही ते म्हणाले. राज्यात काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीला 24 ते 25 जागा मिळतील असा आमचा अंदाज असल्याचं चव्हाण म्हणाले. देशात यावेळी NDAचं सरकार येणार नाही, परिवर्तन होणार असा अंदाज देखील अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. देशात काँग्रेस आणि घटक पक्षाला किती जागा मिळतील यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगीतलं. नांदेड मध्ये मात्र  100 टक्के काँग्रेसच जिंकणार असा  दावा देखील त्यांनी केला.

न्यूज18 लोकमतचा सर्व्हे

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व सात टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोल समोर आले आहेत. 'न्यूज18' ने केलेल्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसताना दिसत आहे. तर भाजप शिवसेना दमदार कामगिरी करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कुणाला किती जागा?

भाजप - 21 ते 23

शिवसेना - 20 ते 22

काँग्रेस - 0 ते 1

राष्ट्रवादी - 3 ते 5

यंदाची लोकसभा निवडणूक कोणत्या मुद्द्यांनी गाजली?

पश्चिम महाराष्ट्र

यावेळीची लोकसभा निवडणूक रंगली ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय जुगलबंदीने. पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा मनसुबा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आखण्यात आला होता. माढा, सातारा आणि बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 10 जागा आम्ही जिंकणार, असा दावा भाजपकडून करण्यात आला.

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या माढा, बारामती, सातारा, कोल्हापूर यासह भाजप-शिवसेना युतीने जिंकलेल्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. 2014 च्या निवडणुकीत युतीने मुसंडी मारत या भागात काँग्रेस-राष्ट्रवादीला पहिला हादरा दिला. यावेळी तर हे 10 मतदारसंघ जिंकण्याच्या इराद्याने मुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.

उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या 8 जागा असून त्यामध्ये नगर दक्षिण, शिर्डी, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, दिंडोरी आणि रावेर या मतदारसंघांचा समावेश आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत युतीनं उत्तर महाराष्ट्रात एकहाती विजय मिळवत उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी सगळ्या जागा कायम राखणं भाजपसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. कारण यंदा प्रत्येक मतदारसंघात तुल्यबळ लढत होत आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत नेमकं काय झालं?

मागील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची मोठी लाट निर्माण झाली होती. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना मानहाणीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपला देशभरात ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातही याचं प्रतिबिंब पाहायला मिळालं होतं. भाजप-शिवसेनेनं मोठी झेप घेतली होती. दुसरीकडे, तेव्हा सत्तेत असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन अंकीही जागा मिळवता आल्या नव्हत्या.

कुणाला किती जागा मिळाल्या?

भाजप - 23

शिवसेना - 18

राष्ट्रवादी - 4

काँग्रेस - 2

स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1

First published: May 19, 2019, 8:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading