SPECIAL REPORT : गुरू-शिष्याच्या भेटीमागे दडलंय काय?

SPECIAL REPORT : गुरू-शिष्याच्या भेटीमागे दडलंय काय?

ओल्या दुष्काळाच्या निमित्तानं शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसद भवनात भेट घेतली. राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेतली. राज्यातील ओला दुष्काळाच्या मुद्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं पवारांनी सांगितलं. पण राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर या भेटीवरुन अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

ओल्या दुष्काळाच्या निमित्तानं शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसद भवनात भेट घेतली. राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. जवळपास 45 मिनिटं या दोन दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र, राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चेविषयी विचारलं असता पवारांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली.

पवारांचं हे सूचक हास्य बरचं काही सांगून गेलं. कारण सध्या राज्यात सत्तास्थापनेचा घोळ अद्यापही कायम आहे. तर शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खलबतं सुरूच आहे. सोमवारी राज्यसभेतील आपल्या भाषणात मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतूक केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची सत्तेसाठी जुळवा जुळव सुरू असताना शरद पवारांनी सोनिया गांधींची भेट घेतली. मात्र, त्यानंतर पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे या संभावित आघाडीविषयी भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

पवारांच्या या राजकीय गुगलीनंतर राज्यातील सत्तास्थापनेचं केंद्र दिल्लीकडं सरकलं. अशातचं पवार- मोदी भेटीकडं सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. कारण या दोन नेत्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. पंतप्रधान झाल्यानं नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये जावून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक केलं होतं. एवढच नव्हे तर त्यांनी पवार हे आपले राजकीय गुरू असल्याचं जाहीरसभेत सांगितलं होतं.

पवार- मोदी यांची मैत्री असली तरी नुकतेचं पार पडलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकी दरम्यान हे दोन्ही नेते आमने-सामने उभे ठाकले होते. पण, ओल्या दुष्काळ्याच्या निमित्तानं पवार-मोदी भेटीविषयी अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

======================

Published by: sachin Salve
First published: November 20, 2019, 9:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading