नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेतली. राज्यातील ओला दुष्काळाच्या मुद्यावरुन या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. शरद पवारांनी यासंदर्भातील निवेदनही मोदींना दिलं. जवळपास 45 मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. दरम्यान, पुण्यात वसंतदादा पाटील शुगर इंटरनॅशनल कॉन्फरन्स होणार आहे. 22 देशातील लोकं इथं येतील. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांनी यावं, यासाठी नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यासाठी भेट घेतोय, असं पवारांनी आधीच स्पष्ट केलं होतं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा