महाशिवआघाडीचा निर्णय मुंबईतच होणार? काँग्रेस नेत्यांनी सेनेसोबत बैठकीचा 'हा' दिवस ठरवला!

महाशिवआघाडीचा निर्णय मुंबईतच होणार? काँग्रेस नेत्यांनी सेनेसोबत बैठकीचा 'हा' दिवस ठरवला!

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. संध्याकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा रात्री आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकारात्मक बैठक झाली असून सेनेच्या नेत्यांच्या संपर्कात आहोत, असं स्पष्ट केलं आहे.

राज्यातील सत्ता स्थापनेबद्दल नवी दिल्ली हालचालींना वेग आला. आज संध्याकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मॅरेथॉन बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाशिवआघाडीची तत्वत: मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि चर्चा केली. या बैठकीनंतर पुन्हा एकदा उशिरा रात्री राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली.

या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. आम्ही मुंबईतील नेत्यांच्या अर्थात शिवसेनेच्या संपर्कात होतो. उद्या दिल्लीत दोन बैठका होईल आणि त्यानंतर मुंबईत तिन्ही पक्षांच्या नेत्यांची शुक्रवारी बैठक होईल', अशी माहिती चव्हाणांनी दिली.

तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही 'या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून काही निर्णयावर आमच्या भूमिका स्पष्ट झाल्या आहे. लवकरच गोड बातमी दिली जाईल', असं स्पष्ट केलं.

उद्या गुरुवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन बैठक पार पडणार आहे. त्यानंतर मुंबईत शिवसेनेसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेचा निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, या दोन बैठकीच्या आधी सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली आणि नंतर सर्व नेते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी चर्चेसाठी एकत्र आले होते. या बैठकीला शरद पवार, अहमद पटेल, प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह दोनही पक्षांचे मिळून 15 नेते उपस्थित होते. या बैठकीत शिवसनेसोबत एकत्र येण्यासाठी किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेनेसारख्या वैचारिक विरोधकासोबत एकत्र येण्यासाठी समान कार्यक्रमाची गरज आहे. त्यामुळे इतर वादग्रस्त मुद्दे बाजूला पडतील असं काँग्रेसला वाटतंय. त्यामुळे पहिल्यांदा समान किमान कार्यक्रम तयार करण्यावर सर्वांचं एकमत झालंय.

किमान समान कार्यक्रमातले 6 महत्त्वाचे मुद्दे

सुरुवातीला कोरडा आणि नंतर ओल्या दुष्काळात भरडल्या गेलेल्या शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी देणार. सातबारा कोरा करणार.

रोजगार वाढीला चालणा देण्यासाठी खास कार्यक्रम राबविणार.

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी खास उपाययोजना करणार. अवास्तव खर्चाला कात्री लावणार.

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना वेग देत विकासाची गती कायम राखणार.

शेतकरी, शेतमजूर आणि तळातला माणूस हा नव्या सरकारचा केंद्रबिंदू असणार.

उद्धव ठाकरे यांनी घोषणा केलेली 10 रुपयांमध्ये थाळी ही योजनाही किमान समान कार्यक्रमाचा भाग असणार आहे.

==========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2019 11:22 PM IST

ताज्या बातम्या