नवी दिल्ली, 11 मार्च : पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमती वाढत असताना सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Govt) पेट्रोल-डिझेल GST अंतर्गत आणण्याची मागणी केली आहे. या मागणीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की, पेट्रोल-डिझेल जीएसटीअंतर्गत आल्यास, यामुळे केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारला फायदा होईल. त्याशिवाय केंद्राने असा निर्णय घेतल्यास, महाराष्ट्र सरकार त्याचं पूर्ण समर्थन करेल, असंही राज्य सरकारने म्हटलं आहे.
मनी कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीरसिंग बिधुरी यांनी चर्चेदरम्यान सांगितलं की, पेट्रोल आणि डिझेल जीएसटी कक्षेत आणलं तर, किंमती 25 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात.
त्याशिवाय, दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी विधानसभेत सांगितलं की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पेट्रोल-डिझेल GST अंतर्गत आणण्याची मागणी केली आहे. देशाच्या राजधानीसह संपूर्ण देशाला सरकारच्या या निर्णयाचा फायदा होईल, असंही सत्येंद्र जैन म्हणाले.
मागील 12 दिवसांपासून इंधनदर स्थिर -
मागील 12 दिवसांपासून इंधन दरात कोणतीही वाढ झालेली नाही. परंतु त्याआधी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आपल्या रेकॉर्ड स्तरावर पोहचल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमन, RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्यासह पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापर्यंत अनेकांनी इंधनाच्या वाढत्या दराबाबत चिंता व्यक्त केली आहे.
आतापर्यंत किती वाढ?
फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल दरात 16 दिवस वाढ होत होती. मुंबईत पेट्रोल 97.57 रुपयांवर गेलं आहे. जवळपास सर्वच शहरांत पेट्रोल All Time High Price वर आहे. या वर्षात जानेवारी आणि फेब्रुवारीतील 25 दिवसांत पेट्रोल 7.36 रुपयांनी महागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Nirmala Sitharaman, Petrol and diesel price, Petrol price hike