मुंबई, 1 मे: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Coronavirus) अद्यापही कायम आहे. रुग्णांच्या वाढीला काहीसा ब्रेक लागला असला तरी रुग्ण संख्या वाढीचं सत्र सुरूच आहे. हेच लक्षात घेता आगामी काळात बाधितांच्या संख्येत आणखी वाढ होऊ नये यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) दोन राज्यांना उत्पत्तीची संवेदनशील राज्य (Sensitive origin states) म्हणून घोषित केलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी एक आदेश काढला आहे. ज्यात म्हटले आहे की, उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) आणि पश्चिम बंगाल (West Bengal) हे उत्पत्तीची संवेदनशील राज्ये आहेत. त्यामुळे या राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना आता आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक असणार आहे.
इतर राज्यांतून कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल ही राज्ये उत्पत्तीची संवेदनशील जागा असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. त्यानुसार आता पुढील आदेश येईपर्यंत ही दोन्ही राज्ये उत्पत्तीची संवेदनशील ठिकाणे मानली जातील. तसेच या ठिकाणांहून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी निश्चित करण्यात आलेली एसओपी लागू असणार आहे. त्यांना प्रवेशापूर्वी 48 तास आधीचा निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवावा लागणार आहे.
Corona Vaccine सर्व ओझं माझ्या खांद्यांवर आलं, मी एकटा काय करणार? अदार पुनावालांच्या भावनांचा स्फोट
यापूर्वी 6 राज्यांना केलं होतं sensitive origin घोषित
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राने राजस्थान, गुजरात, दिल्ली, गोवा, केरळ, उत्तराखंड या राज्यांना उत्पत्तीची संवेदनशील राज्ये म्हणून घोषित केले होते. त्यानंतर आता उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांनाही sensitive origin म्हणून जाहीर करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशातही कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या ही वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे येथून येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात आणखी वाढू नये यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Maharashtra, Uttar pradesh