LIVE : सीरमच्या आदर पुनावाला यांना Y दर्जाची CRPF सुरक्षा; गृहमंत्रालयाचा दुजोरा

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | April 28, 2021, 20:21 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:21 (IST)

  रिलायन्स उद्योग समूह गुजरातच्या जामनगर इथं 1 हजार बेड‌चं कोविड सेंटर उभारणार, कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर विनामूल्य उपचार होणार, आठवडाभरात 400 बेड‌्स उपलब्ध केले जाणार

  20:59 (IST)

  राज्यात दिवसभरात 63,309 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 61,181 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 985 रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 83.4, मृत्युदर 1.5%
  राज्यात सध्या 6 लाख 73,481 ॲक्टिव्ह रुग्ण

  20:55 (IST)

  नाशिक जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी
  ऑक्सिजन टंचाई दूर करण्यासाठी सरकारचं पाऊल
  3 वर्षांपासून बंद प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती
  दररोज 600 सिलेंडरचं होणार वितरण

  20:49 (IST)

  1 मेपासून 18 वर्षांवरील लसीकरण सरसकट अशक्य
  अजून बऱ्याच अडचणी - प्राजक्त तनपुरे
  'रशियाच्या स्पुटनिक लसीला अजून परवानगी नाही'
  'सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस उपलब्ध'
  लसीकरण साठा पुरेसा नाही - प्राजक्त तनपुरे
  '18 वर्षांवरील लसीकरणासाठी कालावधी लागणार'

  20:23 (IST)

  'सीरम'च्या आदर पुनावाला यांना CRPF ची सुरक्षा

  भारतासह जगाला मोठ्या प्रमाणावर कोविड लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटे CEO आदर पुनावाला यांना Y दर्जाची सुरक्षा पुरवली जाणार आहे. CRPF कडून त्यांना ही सुरक्षा मिळेल.

  केंद्रीय गृहमंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

  19:52 (IST)

  पुण्यात दिवसभरात 3978 नवे रुग्ण
  पुण्यात दिवसभरात 4936 रुग्णांना डिस्चार्ज
  पुण्यात दिवसभरात 85 रुग्णांचा मृत्यू

  19:12 (IST)

  नाशिक - अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस
  पिंपळगाव, ओझर, आडगावमध्ये गारांचा पाऊस
  उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
  अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ

  18:47 (IST)

  लसीकरणाचा दुसरा डोस घेणाऱ्यांचं 'वेगळं' आणि पहिला डोस घेणाऱ्यांचं 'वेगवान' नियोजन करणं हे आव्हानात्मक काम, लसीकरण करणाऱ्या यंत्रणांना शुभेच्छा - पंकजा मुंडे

  18:32 (IST)

  नागपुरात दिवसभरात 102 रुग्णांचा मृत्यू
  नागपुरात दिवसभरात 7503 नवीन रुग्ण

  18:7 (IST)

  कोव्हिशिल्ड लसीच्या किमतीत घट
  'सिरम'नं लसीची किंमत 100 रुपयांनी केली कमी
  राज्यांना 400 ऐवजी 300 रुपयांत मिळणार लस
  अदर पुनावालांची ट्विट करत माहिती

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स