LIVE: Haiti मध्ये भूकंपाचा मोठा धक्का, 29 जणांचा मृत्यू

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळण्यात यश आलं आहे. जैश-ए-मोहम्मदच्या 4 दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये अटक करण्यात आली आहे

 • News18 Lokmat
 • | August 14, 2021, 23:32 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:3 (IST)

  मुंबई - दहिसरमध्ये एका गाडीत आढळली स्फोटकं
  आमदार प्रकाश सुर्वेंच्या कार्यालयाबाहेर होती गाडी
  अशोक वन परिसरात एका गाडीत आढळली स्फोटकं
  फटाक्यांसाठीचे ज्वलनशील पदार्थ असल्याची माहिती
  मुंबई पोलिसांचं बॉम्बशोधक पथक घटनास्थळी 

  21:27 (IST)

  केंद्रीय गृहमंत्रालयाकडून शौर्य पदकांची घोषणा
  देशातील 1,380 पदक विजेत्यांची यादी जाहीर
  उत्कृष्ट सेवेकरिता 3 'राष्ट्रपती पोलीस पदकं'
  25 अधिकारी, कर्मचाऱ्यांना 'पोलीस शौर्य पदकं'
  गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 45 'पोलीस पदकं'
  11 पोलीस अधिकाऱ्यांना 'केंद्रीय गृहमंत्री पदक'
  अग्निशमन दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदकं
  एकूण 8 जणांना 'अग्निशमन सेवा शौर्य पदकं'

  20:29 (IST)

  राज्याची कोरोना लसीकरणात विक्रमी कामगिरी
  दिवसभरात 9 लाखांहून अधिकांचं लसीकरण
  एका दिवसात लसीकरणाची सर्वाधिक आकडेवारी
  'कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचं शस्त्र'
  'पुरवठा सुरळीत राहिल्यास मोठ्या संख्येनं लसीकरण'
  'दिवसाला 10 लाख लसीकरणाची राज्याची क्षमता'
  'विक्रमी लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील'
  आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केलं मत 

  15:2 (IST)

  जम्मू-काश्मीरमध्ये 4 दहशतवाद्यांना अटक
  जैश-ए-मोहम्मदचा मोठा कट उधळला
  15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर जैशचा कट
  जम्मूमधील वाहनांवर लावणार होते आयईडी

  15:0 (IST)

  किश्तवाडमध्ये आयईडी बॉम्ब नष्ट करण्यात यश
  दहशतवाद्यांकडून पेरण्यात आला होता बॉम्ब
  आयईडी बॉम्ब नष्ट केल्यानं मोठी दुर्घटना टळली

  14:48 (IST)

  पुण्यातही आढळले डेल्टा प्लसचे 6 रूग्ण
  शहर आणि ग्रामीण भागातही डेल्टा प्लसचे रूग्ण आढळले

  13:26 (IST)

  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा नागरी सत्कार
  राज ठाकरे, आशा भोसले, आशिष शेलार उपस्थित
  बाबासाहेब पुरंदरेंच्या 'ओंजळ' पुस्तकाचं प्रकाशन
  '6 वर्षांचा असताना बाबासाहेबांना पहिल्यांदा पाहिलं'
  'बाबासाहेबांची शिवाजी महाराजांची भूमिका पाहिलीय'
  पूर्वीच्या शिवसृष्टीची आज आठवण झाली - राज ठाकरे

  12:48 (IST)

  देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपची बैठक
  मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक
  गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, प्रवीण दरेकर उपस्थित
  प्रसाद लाड, मंगल प्रभात लोढा, भातखळकरही हजर

  12:46 (IST)

  गडकरींच्या पत्राची मुख्यमंत्र्यांकडून तातडीनं दखल
  त्वरित अहवाल देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

  12:46 (IST)

  नितीन गडकरींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
  'वाशिममध्ये लोकप्रतिनिधींकडून कामात अडथळे'
  'राष्ट्रीय महामार्गांच्या कामात शिवसेनेकडून अडथळा'
  'अडथळ्यांमुळे महामार्गाची कामं बंद करावी लागली'
  'अन्यथा कामं मंजूर करतांना विचार करावा लागेल'

  कोरोना त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्याचे लेटेस्ट अपडेट्स