महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते दिल्लीत; सोनिया गांधींची घेणार भेट

महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते दिल्लीत; सोनिया गांधींची घेणार भेट

खातेवाटप, मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींसोबत करणार चर्चा.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास (प्रतिनिधी)नवी दिल्ली, 04 डिसेंबर: उद्धव ठाकरे आणि 6 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एक आठवडा होत आला तरीही अद्याप खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ठोस काही ठरत नसल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचं फक्त सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आज दिल्लीत पक्षीतील जेष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. दिल्लीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांच्यासह अनेक आमदार दिल्लीत आले आहेत. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत खातेवाटपासंदर्भात चर्चा करणार आहेत. काँग्रेसचे काही नेते आपल्या समर्थकांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडावी यासाठीदेखील प्रयत्नात आहे.

वाचा-कडाक्याच्या थंडीत एका वर्षाच्या बाळाला रस्त्यावर दिलं टाकून, पुढे काय घडलं?

काँग्रेसच्या खात्यात एकूण 13 मंत्रिपदं आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागावी यासाठी चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. आज राज्यात राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. आज दुपारी 3 वाजता ही महत्त्वाची बैठक होणार आहे. यामध्ये आगामी हिवाळी अधिवेशनबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच खातेवाटप आणि काही मोठे निर्णय होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

PM नरेंद्र मोदींनी दिलेल्या मंत्रिपदाच्या ऑफरवर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या प्रयोगाची देशपातळीवर चर्चा होतेय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेसोबत एकत्र आल्याने भाजपला मोठा दणका बसला. या आघाडीचे शिल्पकार होते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. त्यांनी एका मुलाखतीत गेल्या महिनाभरात घडलेल्या अनेक घटनांचा खुलासा केलाय. या सगळ्या घडामोडींमध्ये त्यांची गाजली होती ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची भेट. या भेटीत नेमकं काय झालं तेही पवारांनी सांगितलंय. खासदार सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती असं पवारांनी स्पष्ट केलंय. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

वाचा-SPECIAL REPORT : औरंगाबादमधील सिडको भागात बिबट्या आला कुठून?

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

First published: December 4, 2019, 8:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading