Home /News /national /

मतभेद असतील, पण CM उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भावनिक नातं- संजय राऊत

मतभेद असतील, पण CM उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भावनिक नातं- संजय राऊत

'राजकारणाच्या पलिकडे अशी नाती असू शकतात. प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नये.'

    नवी दिल्ली 21 फेब्रुवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली भेटीवर आहेत. मुख्यमंत्रिपदावर आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय. या दौऱ्यात मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीतल्या प्रचारानंतरची मोदी आणि ठाकरेंची ही पहिलीच भेट आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत उद्धव ठाकरे यांच्या गाठी भेटी सुरळीत पार पडाव्यात याची जय्यत तयारी केलीय. महाराष्ट्राच्या विकासासाठी ठाकरे हे मोदींना भेटणार असून त्यांच्यात एक वेगळं नातं आहे असंही राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत म्हणाले, वैचारिक आणि तात्विक मतभेद असू शकतात. मात्र नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचं एक भावनिक नातं आहे. राजकारणाच्या पलिकडे अशी नाती असू शकतात असंही राऊत यांनी सांगितलं. गंमत कराल तर जंमतच करून टाकेल, अजितदादांनी उपटले कार्यकर्त्यांचे कान, VIDEO ही शिष्टाचार भेट असल्याचं सांगितलं जातं आहे. मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वच मुख्यमंत्री हे पंतप्रधानांची भेट घेत असतात. हा शिष्टाचार समजला जातो. या भेटीत मुख्यमंत्री हे आपल्या राज्याचे प्रश्नही पंतप्रधानांपुढे मांडतात. मात्र 25 वर्ष शिवसेना हा भाजपचा मित्रपक्ष होता आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सरकारचा मोठा निर्णय, भरतीसाठी महापोर्टल बंद करून नव्या संस्थेची निवड करणार ठाकरे सरकारला आता तीन महिने होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री दिल्लीत जाणार आहेत. या भेटीत ते आणखी काही मंडळींचीही भेट घेण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही भेट घेणार असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनीही एका पत्रकार परिषदेत बोलताना दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटणार असल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध झुगारत उद्धव ठाकरे यांनी राज्यात CAA आणि NPR लागू करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे या भेटीत काय चर्चा होते याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Narendra modi, Uddhav thackeray

    पुढील बातम्या