दसऱ्या मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरेंकडून 'या' 5 मोठ्या घोषणा

दसऱ्या मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरेंकडून 'या' 5 मोठ्या घोषणा

दसऱ्या मेळाव्याच्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केल्या मोठ्या घोषणा

  • Share this:

मुंबई, 8 ऑक्टोबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (8 ऑक्टोबर) दसऱ्या मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित केलं. यावेळेस उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह मित्रपक्ष भाजपवर सडकून टीका केली. तसंच, 'आमचा कारभार कसा असेल तर प्रभू रामचंद्रासारखा असेल, जनतेच्या सेवेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आजही आम्ही ठाम आहोत, विशेष कायदा करा आणि अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधा ही आजही शिवसेनेची मागणी आहे', असं सांगत त्यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा राग आळवला. विशेष म्हणजे आपल्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वपूर्ण आणि मोठ्या घोषणादेखील केल्या.

दसऱ्या मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी केल्या मोठ्या घोषणा

1. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार

2. गोरगरिबांना १० रुपयांमध्ये चांगल्या अन्नाची थाळी देणार

(वाचा : ऊतू नका, मातू नका.., उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे)

3. १ रुपयामध्ये प्राथमिक आरोग्य चाचण्या आणि त्यांची केंद्रे मी संपूर्ण महाराष्ट्रभर करणार

4. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ३०० युनिटचा घरगुती वीज वापराचा दर शिवसेना ३० टक्क्यांनी कमी करणार

(वाचा : जे सुडाचं राजकारण करतील त्यांना चिरडून टाकू - उद्धव ठाकरे)

5.ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना बस सेवासुद्धा देणार

(वाचा :  'मॉब लिंचिंग'च्या वादावर ओवेसींनी दिलं मोहन भागवतांना 'हे' उत्तर!)

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील अन्य महत्त्वाचे मुद्दे

1. कदाचित या देशातली ही एकमेव संघटना जी समाजकारणही करते आणि राजकारणही करते, ती म्हणजे शिवसेना न चुकता विजयादशमी शिवतीर्थावर साजरी करते.

2. विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजा करायची असते, माझी शस्त्र ही माझ्या समोर महाराष्ट्रभर पसरलेली आहेत आणि तुमच्या सगळ्यांचं पूजन करून मी याच महिन्यात असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकवायला निघालो आहे.

3. आजही आम्ही ठाम आहोत, विशेष कायदा करा आणि अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधा ही आजही शिवसेनेची मागणी आहे.आमचा कारभार कसा असेल तर प्रभू रामचंद्रासारखा असेल, जनतेच्या सेवेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

4. सत्ता तर मला पाहिजेच, कोणत्याही परिस्थितीत पाहिजे.

5. हे शिवसैनिक जे आहेत, ही माझी तलवार आहे. गोरगरिबांचं अन्यायापासून रक्षण करणारी ढाल आहे आणि प्रेमाने आलिंगन दिल्यानंतर पाठीत वार करणाऱ्यांचा कोथळा काढणारी ही माझी वाघनखं आहेत.

6. लपुनछपून काही करण्याची औलाद ही शिवसेनेची नाही, करू ते उघडपणे करू. प्रेमही उघड करू आणि वैर सुद्धा आम्ही उघड करू. शिवसेना कोणाही समोर वाकु शकत नाही, कोणीही शिवसेनेला वाकवू शकत नाही. शिवसेना वाकेल ती शिवरायांसमोर आणि मराठी मातेच्या या पुत्रांसमोर वाकेल दुसऱ्या कोणाची हिम्मत नाही आहे.

7. अजित पवारांच्या डोळ्यात अश्रू की आता राजकारणाचा स्तर खालावलेला आहे आणि म्हणून मी शेती करणार. हरकत नाही पण धरणात पाणी नसलं तर काय करणार?

8. प्रत्येक निर्णय घेताना माझ्या मनात एकच विचार असतो की माझ्या सैनिकाला काय वाटेल. शिवसैनिकाला हे पटेल की नाही पटणार.

9. मला युवकांना सांगायचं आहे की तुम्ही आता पुढे या, आज पर्यंत इतिहास हा युवकांनीच घडवला आहे आणि हा इतिहास पुन्हा घडवायचा आहे.

10. मी तमाम महाराष्ट्रातल्या सैनिकांना जिथे जिथे त्यांच्या जागा सुटल्या असतील त्यांची मी माफी मागतो, पण एक लक्षात घ्या तुमची ताकद कधीही कुठेही कमी होता कामा नये. प्रत्येक गावातील, प्रत्येक खेड्यातील प्रत्येक घरामध्ये शिवसेना आणि शिवसैनिक हा असलाच पाहिजे.

...म्हणून भाजपसोबत युती केली, उद्धव ठाकरेंचं UNCUT भाषण

Published by: Manoj Khandekar
First published: October 8, 2019, 9:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading