Elec-widget

निवडणूक तारखांची घोषणा, आयोगाची राजकीय पक्षांनी नवी सूचना

निवडणूक तारखांची घोषणा, आयोगाची राजकीय पक्षांनी नवी सूचना

निवडणूक आयोगानं पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुकांसाठी प्लास्टिकच्या वापर टाळण्याचे आदेश दिले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. दोन्ही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दोन्ही राज्यांत 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. यासोबतच आयोगानं 64 जागांवर पोटनिवडणुकांसाठीही सूचना जारी केल्या आहेत. यादरम्यान निवडणूक आयोगानं पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुकांसाठी प्लास्टिकच्या वापर टाळण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी प्लास्टिक वापरासंदर्भात विशेष निर्देश जारी केले आहेत. राजकीय पक्षांनी प्रचारादरम्यान पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करावा, असं आवाहन सुनील अरोरा यांनी केलं आहे.

निवडणुकीदरम्यान प्लास्टिकचा वापर टाळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात देश प्लास्टिक मुक्त करण्याचे आवाहन देशवासीयांना केलं होतं. ही बाब लक्षात ठेवून केंद्र सरकारच्या सर्व विभागांनी आपल्या दैनंदिन जीवनाच्या वापरातून प्लास्टिक हद्द पार करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लास्टिक उत्पादनामुळे देशाला उत्पन्न तर मिळतंय पण दुसरीकडे यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याचा सर्वाधिक वाईट परिणाम शहरी आणि ग्रामीण लोकांवर होत आहे.

(वाचा :  दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात राजकीय फटाके, निवडणूक तारखांची झाली घोषणा)

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commision of India) शनिवारी (21 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

Loading...

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. तर हरियाणा आणि झारखंडमध्ये प्रत्येकी 90 आणि 82 जागा आहेत. या दोन्ही राज्यात ऑक्टोबर 2014 विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर निकाल 19 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले होते. दोन्ही राज्यातील विधानसभेचा कालावधी लवकरच संपणार आहे.

(वाचा :  निवडणुकीच्या घोषणेनंतर कोल्हापुरात होणार मोठी कारवाई, तब्बल 1500 समाजकंटक हिटलिस्टवर!)

288 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

अधिसूचना - 27 सप्टेंबर.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख - 4 ऑक्टोबर.

उमेदवारी अर्ज छाननी - 5 ऑक्टोबर.

उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख - 7 ऑक्टोबर

उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पर्यवेक्षक पाठवणार

2 नोव्हेंबरपूर्वी निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार

(वाचा : भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजेंना मोठा धक्का)

2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात कुणाला किती जागा?

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

काय आहे हरियाणातील स्थिती?

हरियाणामध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. हरियाणात मागील निवडणुकीत 90 पैकी 47 जागांवर भाजपने विजय मिळवला होता आणि मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar)यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते.

विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 02:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...